अंतिम सामना अत्यंत लक्षवेधी ठरल्याने वाढली सरपंच करंडक स्पर्धेची रंगत
कोरेगाव भिमा – सणसवाडी (ता. शिरूर) येथील सनग्लो मैदानावर झालेल्या अंतिम सामान्यात जय मल्हार संघाला नमवत शंभो स्ट्रायकर्स यांनी सरपंच करंडकावर आपलं नाव कोरले असून सणसवाडी पंचक्रोशीतील ग्रामस्थांना भावलेली व आकर्षित करणारी सरपंच करंडक स्पर्धा मोठ्या उत्साहाच्या, जल्लोषाच्या व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
सणसवाडी फायटर्स आयोजित सरपंच करंडक स्पर्धेतील अंतिम सामान्याच्या प्रसंगी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, मार्केट कमिटीचे माजी संचालक दत्तात्रय हरगुडे, सरपंच सुवर्णा दरेकर, उपसरपंच दत्तात्रय हरगुडे, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र दरेकर, सागर दरेकर,मोहन हरगुडे सदस्या शशिकला सातपुते, ललिता दरेकर, निकिता हरगुडे यासह स्थानिक प्रतिनिधी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.