Wednesday, July 24, 2024
Homeताज्या बातम्यासंस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष वाढवला मेहनत केली त्यांच्या डोळ्या...

संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष वाढवला मेहनत केली त्यांच्या डोळ्या देखत पक्ष  काढून घेण्याचे पाप करण्यात आले – जयंत पाटील

  • राज्याची कायदा सुव्यवस्था ढासळली आहे…. आमदार पोलीस चौकीत गोळीबार करतायेत.
  • आमदार अशोक पवार यांच्या एकनिष्ठेचे जयंत पाटील यांच्याकडून कौतुक.
  • शरद पवारांचे बळ म्हणजे अशोक पवार यांच्यासारखे निष्ठावान नेते कार्यकर्ते सोबत आहे हेच मोठे बळ आहे.
  • राजकारणाचे काय होईल त्याची तमा नाही मी ठामपणे शरद पवार साहेबांसोबत –  आमदार अशोक पवार

तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) पक्ष काढून घेण्याचं पाप करण्यात आले आहे.राज्यातील निवडणुकीत तिकिटे व ए बी फॉर्म वाटप माझ्या सहीने झाली असून ए बी फॉर्म देणारा चुकीचा म्हणजे हे पण अपात्र आहे. मंत्री मंडळ विस्ताराच्या वेळी माझ्या सहिने सर्व मंत्री मंडळाची नावे दिली.या देशात तारतम्य सोडून व्यवहार सुरू आहे. संस्थापक आहेत त्यांच्या डोळ्या देखत त्यांच्याकडून पक्ष काढून घेण्याचं पाप करण्यात आले आहे. तुम्ही आमदार निवडून देत तो विकत घेतला जातो त्याला पळवले जाते ही लोकशाही सुरू आहे. अशी खंत व उद्विग्नता जयंत पाटील यांनी तळेगाव ढमढेरे येथे बोलताना व्यक्त केली.

      राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून आमदार पोलीस चौकीत गोळीबार करत आहेत.  गोळीबार झाला त्याच्या तब्येती बाबत काही माहिती नाही.मुख्यमंत्र्यांच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना भाजपा आमदाराला गोळ्या झाडण्याची गरज का भासली ? ही तरी चौकशी केली जाईल का? मी मुख्यमंत्र्यांना करोडो रुपये दिले. मुख्यमंत्री गुन्हेगार तयार करण्याचे व त्यांचे संरक्षण करण्याचे काम करत आहे असा आरोप होत आहे. काहीच पाहायचे नाही ठरले आहे. एवढी तरी चौकशी कराल की नाही असा घणाघात  करत जयंत पटेल यांनी राज्य सरकारला धारेवर धरले.

 यापुढे बोलताना जयंत पाटील यांनी याबाबत आमदार यांनी मुलाखत दिली असून आमदार म्हणतात म्हणून खरे समजायला हवे. सगळ्यात मोठी समस्या राज्य सरकारच्या एजेन्सी सरकारचे संरक्षण करण्यात व वाचवण्यासाठी गुंतलेल्या असून सामान्य माणसांसाठी काम करत नाही.एक आमदारांनी छगन भुजबळांना पेकटात लाथ मारून मंत्रिमंडळातून  बाहेर काढण्याचे म्हटले याबाबत मुख्यमंत्री व दोन उप मुख्यमंत्री यांनी आमदाराला दम,बडबड अथवा काढून टाकल्याचे आईकले का ? बल्ल्या झाल्यामुळे सहन करावा लागत आहे. राज्य सरकार प्रचंड गोंधळात अडकलेल आहे.

    कॉन्ट्रॅक्टरांना कंत्राट मिळूनही काम करता येत नाही,मारहाण होतेय,कोणतेही दोन पक्ष काम अडवतात यामुळे १५ फेब्रुवारी पासून कामे बंद ठेवण्याचे पत्र दिले आहे.तारतम्य सोडून कारभार चालला आहे.

देशातील लोकशाही पूर्ण संपू शकते…  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्ष आणि चिन्ह काल काढून घेण्यात आले शिवसेनेच्या व राष्ट्रवादी केस मध्ये बराच फरक असून येथे संस्थापक अध्यक्ष शरद पवार आहेत त्यांनी पक्ष वाढवला मेहनत केली त्यांच्या डोळ्या देखत पक्ष  काढून घेण्याचे पाप करण्यात आले.भारतातील सर्वसामान्य माणसाची सदसद विवेकबुद्धी शाबूत  असेल जे आज राष्ट्रवादी काँग्रेस सोबत झाले ते भारतातील सर्व पक्षांच होऊ शकते या देशातील लोकशाही पूर्ण संपू शकते याचा विचार सामान्य लोकांनी करायला हवा.

तुम्ही दिलेल्या मतावर निवडून आलेला आमदार खरेदी केला जातो , पळवून नेऊ शकतो ,कुठल्याही पक्षात निवडून येऊ द्या लोह चुंबकासारखा  खरेदी करू शकतो ही लोकशाही सध्या भारतात चालू आहे.त्यामुळे न्यायाचे काम चालू नाही. असा घणाघात करत राज्य सरकारवर टीका केली.

    आमदार अशोक पवार यांच्या निष्ठेचे कौतुक – शरद पवार यांच्याविषयी आमदार अशोक पवार यांच्या निष्ठेचे व सामर्थ्याने पाठीमागे उभे राहण्याचे कौतुक वाटत असून अनेक अडचणी येत असूनही ते  निष्ठेने व सामर्थ्याने मागे उभे आहेत.   शरद पवार यांचे सर्वात मोठे बळ म्हणजे अशोक पवार यांच्या सारखे कार्यकर्ते नेते त्यांच्याबरोबर आहे. सत्तेपुढे न झुकता पडेल ती किंमत देण्याची अशोक पवार यांची मानसिकता मी काही महिण्यांपासून पाहत आहे. त्रास होतोय, त्रास दिला जातोय कारखान्याचा प्रश्न सुटला असता तो कसा जटिल कसा होईल यासाठी काही घटना घडल्या राज्य बँकेने चालू कारखाना चालू राहण्यासाठी प्रयत्न करायचे असतात असे सांगत आमदार अशोक पवार यांच्या निष्ठेचे  कौतुक केले यावर उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला.

सर्वांना त्रास होत आहे.कारखाना चालू झाला असता पण राज्य बँकेची मानसिकता बदलल्याने कारखाना सुरू झाला नाही.या राज्यातील साखर कारखाने शेतकऱ्यांच्या मालकीचे आहेत ते टिकले ,वाढले व चालले पाहिजे ही मानसिकता आता दिसत  नाही.खाजगीकरणाला अधिक महत्व देण्यात येत आहे व सहकारी साखर कारखान्यांचे महत्व कमी होऊ लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हाताला बांधल्या काळया फिती – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जयंत पाटील मार्गदर्शन करण्यासाठी येणार असल्याने शिरूर व दौंड तालुक्यातून कार्यकर्ते, पदाधिकारी व महिला भगिनी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी आमदार अशोक पवार व कार्यकर्त्यांनी पक्ष व पक्ष चिन्ह गेल्यामुळे हाताला काळी रिबीन बांधून निषेध व्यक्त केला.

राजकारणाचे काय होईल त्याची तमा नाही मी ठामपणे शरद पवार साहेबांसोबत – आमदार अशोक पवार – जयंत पाटील यांनी अडचणीच्या काळात पक्षाची धुरा समर्थपणे सांभाळली आहे. लोकांना दिलेल्या शब्दाला व वेळेला पाळणारे आहेत.  शरद पवार यांच्यामुळे चासकमान धरणामुळे झाल्याने ऐंशी टक्के बागायत, रांजणगाव औद्योगिक वसाहत झाली.कारखान्याची अडचण मांडण्याचे काम जयंत पाटील यांनी केले.

माझ्या राजकारणाचे काय होईल त्याची तमा नाही. मी ठामपणे पवार साहेबांसोबत आहे.१९७६ पासून पवार साहेबांवर प्रेम करणारा कार्यकर्ता आहे.पदे दिले ते पक्षाशी किती एकनिष्ठ राहिले हे पाहिलं आहे. असे आमदार अशोक पवार यांनी आपल्या भाषणात भावना व्यक्त करत शरद पवार यांच्या विषयी निष्ठा व्यक्त केली.

यावेळी पक्षाचे विविध पदाधिकारी ,कार्यकर्ते , महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!