Friday, July 12, 2024
Homeक्राइमसंतापजनक : खासगी सावकाराचा पैशासाठी पतीपुढेच पत्नीवर बलात्कार, पुण्यातील हडपसर येथील खळबळजनक...

संतापजनक : खासगी सावकाराचा पैशासाठी पतीपुढेच पत्नीवर बलात्कार, पुण्यातील हडपसर येथील खळबळजनक घटना

व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पुन्हा शरीर सुखाची मागणी करणाऱ्या नराधम खासगी सावकारास पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुणे – हडपसर पुण्यातील हडपसर मध्ये एक संतापजनक व धक्कादायक घटना उघडकीस आली असून खासगी सावकाराने एका व्यक्तीच्या पत्नीवर त्याच्यापुढेच बलात्कार केल्याची संतापजनक घटना पुण्यात घडली आहे. उसने दिलेले पैसे परत न दिल्याने एका नराधमाने पतीला चाकूचा धाक दाखवून त्याच्या समोरच पैसे उसने त्याच्या पत्नीवर बलात्कार केला व पुन्हा शरिसुखाची मागणी करत व्हिडिओ व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील हडपसर परिसरात घडल्यानंतर त्या नरधमाची हडपसर परिसरात गुरुवारी भरपावसात पोलिसांनी धिंड काढली. या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.(Pune Crime News) इम्तियाज हशीम शेख (वय ४७, म्हाडा कॉलनी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

याप्रकरणी बोपखेल येथील ३४ वर्षीय महिलेने हडपसर पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे.मसाले विक्रेता आरोपी इम्तियाज शेख याने फिर्यादी पीडित महिलेच्या पतीस ४० हजार रुपये उसने दिले होते. ते पैसे ते परत करू शकले नाही. त्यामुळे फेब्रुवारी २०२३ मध्ये इम्तियाज याने पतीला जिवे मारण्याची धमकी दिली होती. नंतर त्याने दोघांना तो राहत असलेल्या सुरक्षानगर येथे बोलावून घेतले. तेथे त्याने पतीला समोर बसवून चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली.

तसेच त्याच्यासमोरच फिर्यादीवर महिलेवर बलात्कार केला होता. त्यानंतर आरोपीने याच कारणातून तिच्याकडे पुन्हा शरीरसुखाची मागणी केली; परंतु तिने नकार दिला असता त्याने त्याच्या घरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून झालेले चित्रीकरण पतीला पाठवून व व्हिडीओ सामाजिक माध्यमावर प्रसारित केले.(Pune Crime News)

नवऱ्यासमोरच पीडितेवर बलात्कार – पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या पतीला आरोपीने उसने पैसे दिले होते. काही कारणामुळे पीडित दाम्पत्याला हे पैसे परत करता आले नाही. त्यामुळे आरोपीने फिर्यादी व तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देत हडपसर येथील म्हाडा कॉलनीत बोलावून घेतले. त्यानंतर तक्रारदार महिलेच्या पतीला समोर बसवून त्याने चाकूचा धाक दाखवत पीडितेवर बलात्कार केला. यावेळी त्याने त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली.(Pune Crime News)

आरोपीने तयार केला एमएमएस –आरोपीने या घटनेचा एमएमएस तयार केला. त्यानंतर वारंवार यौन संबंध करण्याची मागणी केली. त्याला पीडितेने विरोध केला. त्यामुळे इम्तियाज हसीन शेख याने ती क्लिप सोशल मीडियावर टाकली. यामुळे ती महिला प्रचंड हादरली. तिला मोठा मानसिक धक्का बसला. शेवटी हिंमत करुन हडपसर पोलीस ठाणे तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ आरोपी इम्तियाज हसीन शेखच्या मुसक्या आवळल्या.(Pune Crime News)

या प्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके (Sr PI Ravindra Shelke) तपास करीत आहेत. (Pune Rape Case)

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!