Monday, June 17, 2024
Homeसाहित्य/सामाजिकचला व्यक्त होऊ या?श्री दत्त जयंती निमित्त सणसवाडी येथे श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक...

श्री दत्त जयंती निमित्त सणसवाडी येथे श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्रामध्ये मोठ्या भक्तिभावाने गुरुचरित्राचे पारायण

सणसवाडी सहा येथे गुंठ्यांत साकारतेय स्वामी समर्थ मंदिर, महिला भगिनिंचा उत्स्फूर्त सहभाग, नऊ दिवस विविध याग,

कोरेगाव भिमा – सणसवाडी (ता.शिरूर) येथील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग शाखा – सणसवाडी (दिंडोरी प्रणीत) येथे श्री दत्त जयंती निमित्त श्री गुरुचरित्र पारायण व अखंड प्रहर-नाम-जप-यज्ञ सोहळ्याचे भव्य दिव्य आजोजन करण्यात आले असून पाचशे सत्तावन्न सेवेकरी गुरुचरित्राच्या पारायणाला ब

सले असून महिला भगीनिंची उपस्थिती लक्षणीय असून अबालवृद्ध या सोहळ्यात मोठ्या भक्तिभावाने सहभागी झाले असून विशेष येथे सद्गुरू सेवेकरी अहोरात्र काम करत आहेत.

सदर धार्मिक सोहळ्याचे नियोजन माजी सरपंच सुरेश हरगुडे, समर्थ ज्वेलर्सचे अशोक ढेकळे, अरुण हिरे, रंजीत घाडगे, दीपक पानसरे, अविनाश घुगे व इतर स्वामी समर्थ सेवेकरी करत आहेत.

बूधवार दि. २० डिसेंबर ते २७ डिसेंबर असा सात दिवसांचा श्री गुरुचरित्र पारायण व अखंड प्रहर-नाम-जप-यज्ञ सोहळा संपन्न होत असून या सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या सेवकरींना गुरुचरित्र अध्यात्म केंद्राकडून देण्यात ग्रंथ उपलब्ध करून देण्यात आला आहे. येथे सप्ताह काळात अखंड चोवीस तास नामजप व विणा पहारा करण्यात येणार आहे.सकाळी आठ ते रात्री आठ महिला भगिनी विणा पहारा तर रात्री आठ ते सकाळी आठ असा पुरुष सेवेकरी विणा पहारा व अखंड सद्गुरू नामस्मरण जप व धार्मिक विधी करण्यात येणार आहे.

असा असणार श्री गुरुचरित्र पारायण व अखंड प्रहर-नाम-जप-यज्ञ सोहळा – पहिल्या दिवशी प्रारंभ श्री गुरुचरित्र पारायण (संकल्पयुक्त) प्रधान संकल्प, पारायण करण्यात आले.दि. १९ डिसेंबर , मंगळवार ग्रामदेवता निमंत्रण, मंडल मांडणी, व पुर्वतयारीदि.२० डिसेंबर, बुधवार ,मंडल स्थापना, अग्निस्थापना, स्थापित देवता हवनदि.२१ डिसेंबर, गुरुवार, नित्य स्वाहाकार, श्री गणेश याग, श्री मनोबोध यागदि.२२ डिसेंबर, शुक्रवार नित्य वाहकार, श्री गीताई यागदि.२३ डिसेंबर , शनिवार,नित्यस्वाहकार, श्री स्वामी यागदि.२४ डिसेंबर , रविवार, नित्य वाहकार, श्री चंडीयागदि.२५ डिसेंबर , सोमवार,नित्य स्वाहाकार, श्री रुद्र याग, श्री मल्हारी यागदि.२६ डिसेंबर , मंगळवार,नित्य स्वाहाकार, बली पूर्णाहुतीदु.१२.३९ वा.श्री दत्त जन्मोत्सव सोहळा दि. २७ डिसेंबर, बुधवार श्री सत्यदत्त पुजन, देवता विसर्जन अखंड नाम-जप-यज्ञ सांगता समारोह, महानैवद्य आरती.

सणसवाडी येथे साकारतेय भव्य दिव्य स्वामी समर्थांचे मंदिर – उद्योगनगरी सणसवाडी येथे मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण झाल्यामुळे जमिनीचे भाव गगनाला भिडलेले असतानाही माजी सरपंच सुरेश सोनबा हरगुडे यांनी आपल्या घराशेजारी सहा गुंठे जागा स्वामी समर्थ मंदिरासाठी दान करत अनोखी स्वामी भक्ती जपली आहे.वर्षभर येथे चालणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांना सरपंच सुरेश हरगुडे व कुटुंबीयांची मोलाची मदत असल्याची भावना सेवेकाऱ्यांनी व्यक्त केली.
श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा वर्षाव आपल्या सर्व सणसवाडी पंचक्रोशीत असावा मोठ्या प्रमाणात असणारे भक्त व साधक यांच्या भक्तीने स्वामींचा सहवास व कृपया वर्षाव अखंड व्हावा या पवित्र शुद्ध हेतूने ही धार्मिक सेवा स्वामींनी करवून घेतली असल्याचे माजी सरपंच सुरेश हरगुडे यांनी सांगितले.

सणसवाडी येथे शासन आपल्या दारी उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!