समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीने ग्रामीण भागातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांचे हित जोपासणार – प्राचार्य अविनाश क्षीरसागर
कोरेगाव भीमा – दिनांक १५ जून
पाबळ – समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीने ग्रामीण भागातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत करून विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या गुणांना चालना देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन श्री भैरवनाथ विद्या मंदिर पाबळ येथे शाळेच्या पहिल्याच दिवशी शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात बोलताना प्राचार्य अविनाश क्षीरसागर यांनी केले.
ॲड .राजेंद्र लुंकड प्रतिक्षा लुंकड यांनी सहा लाख रुपये किंमतीच्या १०००० फुलस्केप वह्या प्रशालेस भेट दिल्या. त्यांच्या योगदानाने ग्रामीण विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी अनपेक्षित पण आवश्यक भेट मिळाली. याप्रसंगी १९७४- ७५ च्या एस.एस.सी.ची बॅच व सामाजिक कार्यकर्ते सुधाकर बारसोडे यांनी आपल्या पत्नी सेवानिवृत्त शिक्षका सुजाता बारसोडे यांच्या स्मरणार्थ प्रशालेस १२५००० किमंतीचे साउंड सिस्टीम भेट दिले.
शासकीय परीपत्रकाप्रमाणे आज १५जून रोजी इ.५वी ते इ.१२वीचे वर्ग सुरू झाले.शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भगवान घोडेकर,पाबळचे सरपंच मारूती शेळके,संचालक नामदेव पानसरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या,क्रमिक पुस्तके तसेच गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमास उपप्राचार्य सुदाम पिंगळे, पर्यवेक्षक तुकाराम ताम्हाणे,रोहीणी गायकवाड, एकनाथ बगाटे, राजश्री रणपिसे,मच्छिंद्र खेडकर, राहुल गायकवाड, कुमारआबा चौधरी,आण्णा ओहोळ,आनंदा गावडे, रोहीदास चौधरी , संतोष क्षीरसागर,संदीप गवारे, अतुल लिमगुडे,अरूण निकम,किरण रेटवडे, सुनील जाधव, देवा शेळके उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एकनाथ शिवेकर तर आभार जितेंद्रकुमार थिटे यांनी मानले.