Saturday, July 27, 2024
Homeताज्या बातम्याश्री दत्त जयंती निमित्त शिक्रापूर येथे श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक...

श्री दत्त जयंती निमित्त शिक्रापूर येथे श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्रामध्ये २२०० सेवेकरी बसले गुरुचरित्राच्या पारायणाला

शिक्रापूर येथील महिला भगिनिंचा मोठ्या प्रमाणावर सहभाग, नऊ दिवस विविध याग

कोरेगाव भिमा – शिक्रापूर (ता.शिरूर) येथील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग शाखा – शिक्रापूर, तळेगाव ढमढेरे रोड (दिंडोरी प्रणीत) येथे श्री दत्त जयंती निमित्त श्री गुरुचरित्र पारायण व अखंड प्रहर-नाम-जप-यज्ञ सोहळ्याचे भव्य दिव्य आजोजन करण्यात आले असून यामध्ये २२२० सेवेकरी गुरुचरित्राच्या पारायणाला बसले असून महिला भगीनिंची उपस्थिती लक्षणीय असून अबालवृद्ध या सोहळ्यात मोठ्या भक्तिभावाने सहभागी झाले असून विशेष येथे सद्गुरू सेवेकरी अहोरात्र सेवा करत आहेत.

बुधवार दि. २० डिसेंबर ते २७ डिसेंबर असा सात दिवसांचा श्री गुरुचरित्र पारायण व अखंड प्रहर-नाम-जप-यज्ञ सोहळा संपन्न होत असून या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञाच्या साहाय्याने गुगल फॉर्म तयार करून नोंदणी करण्यात आली असून सेवकरी यांना गुरुचरित्र अध्यात्म केंद्राकडून देण्यात येणार असून एका कुटुंबासाठी एक असे ग्रंथ वाटप करण्यात येणार आहे.

येथे सप्ताह काळात अखंड चोवीस तास नामजप व विणा पहारा करण्यात येणार आहे.सकाळी आठ ते रात्री आठ महिला भगिनी विणा पहारा तर रात्री आठ ते सकाळी आठ असा पुरुष सेवेकरी विणा पहारा व अखंड सद्गुरू नामस्मरण जप व धार्मिक विधी करण्यात येणार आहे.

असा असणार श्री गुरुचरित्र पारायण व अखंड प्रहर-नाम-जप-यज्ञ सोहळा – प्रारंभ श्री गुरुचरित्र पारायण (संकल्पयुक्त) पहिल्या दिवशी – प्रधान संकल्प, पारायण एकाच बॅचमध्ये करण्यात आला तर दुसऱ्या दिवसापासू गुरुवार दि.२१ डिसेंबर श्री गुरुचरित्र पारायण दोन बॅचमध्ये १ ली बॅच : पहाटे ०४.१५ वा. तर २ री बॅच : सकाळी ०८.०० वा. असा होणार आहे.दि. १९ डिसेंबर , मंगळवार ग्रामदेवता निमंत्रण, मंडल मांडणी, व पुर्वतयारीदि.२० डिसेंबर, बुधवार ,मंडल स्थापना, अग्निस्थापना, स्थापित देवता हवनदि.२१ डिसेंबर, गुरुवार, नित्य स्वाहाकार, श्री गणेश याग, श्री मनोबोध यागदि.२२ डिसेंबर, शुक्रवार नित्य वाहकार, श्री गीताई यागदि.२३ डिसेंबर , शनिवार,नित्यस्वाहकार, श्री स्वामी यागदि.२४ डिसेंबर , रविवार, नित्य वाहकार, श्री चंडीयागदि.२५ डिसेंबर , सोमवार,नित्य स्वाहाकार, श्री रुद्र याग, श्री मल्हारी यागदि.२६ डिसेंबर , मंगळवार,नित्य स्वाहाकार, बली पूर्णाहुतीदु.१२.३९ वा.श्री दत्त जन्मोत्सव सोहळा दि. २७ डिसेंबर, बुधवार श्री सत्यदत्त पुजन, देवता विसर्जन अखंड नाम-जप-यज्ञ सांगता समारोह, महानैवद्य आरती.

गुगल फॉर्मच्या साहाय्याने सेवेकऱ्यांची विशेष नोंदणी – श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास शिक्रापूर येथे सेवेकरी मोठ्या प्रमाणात येत असतात त्यांची नोंदणी करणे हे एक मोठे आव्हान असतात पण याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत सुलभ व सोपे करण्यात येऊन गुगलवर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली व प्रत्येक सेवेकरी यांना नोंदणी क्रमांक देत त्यांची मंडपात अगदी शिस्तबद्ध रित्या आसनव्यवस्था करण्यात आली.

या पारायण व याग कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा परिषद सदस्या कुसूम आबाराजे मांढरे पाटील, गंगाधर पठाडे, श्री दत्तात्रय वाळवेकर, भास्कर पठाडे, विठ्ठल वाघमारे, शहाजी दरेकर, कल्याण फाटके व सर्व सेवेकरी यांच्यावतीने करण्यात येत आहे.

Breaking News.. शिरूर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस फौजदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले रंगेहाथ

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!