Saturday, May 25, 2024
Homeइतरश्री छत्रपती संभाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या नवीन इमारतीचे अभयकुमार साळुंखे यांच्या...

श्री छत्रपती संभाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या नवीन इमारतीचे अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते भूमिपूजन

कोरेगाव भीमा – कोरेगाव भीमा ( ता.शिरूर) येथील श्री छत्रपती संभाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन संस्थेचे अध्यक्ष अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष अभयकुमार साळुंखे यांनी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेतील विद्यार्थी सुसंस्कारित, वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला व माणुसकीचे हृदय असलेला ,समाजाचे उत्तरदायित्व जपणारा सुजाण नागरिक असणार आहे . यावेळी त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान,त्याग ,विद्याव्यासंग व पराक्रमाचा इतिहास डोळ्यासमोर ठेऊन आयुष्य घडवावे जर कोणी शिक्षक कामचुकारपणा करत असेल आपले कर्तव्य प्रामाणिक पणे पार पाडत नसेल तर त्याची तक्रार द्या आम्ही त्याच्यावर तात्काळ कार्यवाही करू , शिक्षकांनी सातवा वेतन घेताना आपल्या पेशाशी प्रामाणिक राहाव असे मत व्यक्त करत शिक्षणाच्या दर्जाबाबत कसलीही तडजोड होणार नसल्याचे स्पष्ट करत आत्म्याला जागून शिकवण्याचे काम करावे असे आवाहन करत.शाळेसाठी दहा लाख काय मागता आम्ही एक कोटी रुपये देऊ तुम्हीही आपला सहभाग द्या शेवटी शाळा हे समाज व देशाला घडवणारे सर्वात मोठे माध्यम आहे.

शाळेच्या गुणवत्तेसाठी तज्ञ शिक्षक, शाळेच्या बांधकामासाठी संस्थेकडून निधी तर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या सर्वांगीण प्रगतीसाठी संस्थेने कटाक्षाने लक्ष घालण्याचे आवाहन ग्रामस्थांकडून करण्यात आले. यावेळी हिंदुराव फडतरे व फडतरे कुटुंबीयांनी शाळेसाठी जागा देत मोठे सामाजिक करू केले असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष अभयकुमार साळुंखे, पदाधिकारी गवळी सर, राजेंद्र शेजवळ,कोरेगाव भीमाचे सरपंच अमोल गव्हाणे, ग्राम पंचायत सदस्य महेश ढेरंगे, संदीप ढेरंगे, वंदना गव्हाणे ,कोमल खलसे, माजी संचालक वर्षा शिवले,विभागीय सदस्य नारायणराव फडतरे, अध्यक्ष रवींद्र फडतरे, माजी पंचायत समिती सदस्य पि.के. गव्हाणे, माजी सरपंच विजय गव्हाणे,माजी उपसरपंच राजेंद्र ढेरंगे, बबुशा ढेरंगे ,राजेंद्र गवदे,सदस्य तुळशीदास फडतरे, महादेव फडतरे,सिराज इनामदार, पोलीस पाटील मालन गव्हाणे व ग्रामस्थ ,विद्यार्थी ,मुख्याध्यापक कुंभारकर सर व सर्व कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवींद्र फडतरे यांनी तर सूत्रसंचालन साकोरे सर व आभार माजी सरपंच विजय गव्हाणे यांनी मानले.

कोरेगाव भीमा येथे शाळेचे भूमिपूजन करताना संस्थेचे अध्यक्ष अभयकुमार साळुंखे व ग्रामस्थ
संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!