Wednesday, September 11, 2024
Homeताज्या बातम्याकोरेगाव भिमा ते श्री क्षेत्र वढू बुद्रुक या कोट्यावधी रुपयांच्या सिमेंट...

कोरेगाव भिमा ते श्री क्षेत्र वढू बुद्रुक या कोट्यावधी रुपयांच्या सिमेंट काँक्रिट रस्त्याला उद्घटना आधीच तडे

कोट्यवधी रुपयांच्या रस्त्याच्या दर्जाबाबत पि एम आर डी ए व बांधकाम विभाग  आता तरी लक्ष देणार का ? 

कोरेगाव भिमा – कोरेगाव भिमा (ता.शिरूर) ते श्री स्वराज्य रक्षक धर्मवीर श्री छञपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळ वढू बुद्रुक ते कोरेगाव भिमा ३ किलोमिटर सिमेंट काँक्रिट रस्त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाला असून रस्त्याचे उद्घाटन होण्याआधीच त्याला तडे गेले आहे.यामुळे रस्त्याची गुणवत्ता आणि दर्जा याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

 श्री छञपती सभाजी महाराज यांच्या समाधी स्थळ असणाऱ्या श्री क्षेत्र वढू बुद्रुक येथील रस्त्याला शासनाने कोट्यवधींचा निधी दिला असून या कामाबाबत खासदार  अमोल कोल्हे व आमदार अशोक पवार यांनी रस्त्यच्या ठेकेदारांना रस्त्याच्या कामाची गुणवत्ता व दर्जा रखायलाच हवी या कामात कसलाही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही असे बजावले होते.

          याबाबत बांधकाम विभागाचे उपअभियंता दाईंगडे यांनी संबंधित रस्त्याची पाहणी केली असून ज्या ठिकाणी तडे गेले आहे त्याची दुरुस्ती करण्यात येणार आहे तसेच जिथे खूप मोठ्या प्रमाणावर तडे आहेत तो पूर्ण पॅच बदलण्यात येईल असे सांगितले.

संबधित रस्त्याची तपासणी करून पि एम आर डी ए व बांधकाम विभागाचे अधिकारी योग्य ती कारवाई करतील का ? असा शंभू भक्तांना प्रश्न पडला आहे.खुद्द छञपती संभाजी महाराज यांच्या बलिदान स्थळाच्या रस्त्याबाबत तरी गुणवत्ता राखली जाईल का ? असा प्रश्न उपस्थित होत असून भूमिपूजन झाल्यावर आत्ता उद्घाटन होईपर्यंत रस्त्याला तडे गेल्याने रस्त्याच्या कामाबाबत व गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण  होत असून शासकीय अधिकारी याकडे आता तरी लक्ष देतील काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!