Tuesday, September 10, 2024
Homeताज्या बातम्याश्री छञपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाचे भुमिपून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री अजित...

श्री छञपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाचे भुमिपून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न

कोरेगाव भिमा – वढू बुद्रुक (ता.शिरूर) येथे स्वराज्यरक्षक धर्मवीर श्री छञपती संभाजी महाराज यांच्या समधिस्थळाचा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार , मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव, माजी आमदार पोपटराव गावडे, सरपंच अंजली प्रफुल्ल शिवले, उपसरपंच राहुल ओव्हाळ व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

        स्वराज्य रक्षक धर्मवीर श्री छत्रपती संभाजीराजे यांच्या समाधी स्थळाचा भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहाच्या वातावरणात पार पडला.यावेळी ठरलेल्या दुपारच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री  अजित पवार ठरलेल्या वेळी उपस्थित राहत भूमिपूजन केले.यावेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये एकरूपता व एकमेकांना सोबत घेत प्रत्येक कार्यक्रम करण्याची आली दिसली.

    ठिकठिकाणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचं स्वागताचे बॅनर त घड्याळ, कमळ व धनुष्यबाण यांचे झेंडे एकत्रित लावण्यात आले होते. 

   यावेळी लावलेल्या बॅनरवर छत्रपती संभाजी महाराज यांचा फोटो नसल्याने माजी सरपंच अनिल शिवले यांनी नाराजी व्यक्त केली तर कोनशिला यावर स्थानिक लोक प्रतिनिधी आमदार अशोक पवार व खासदार अमोल कोल्हे यांची नावे नसल्याने आश्चर्य व्यक्त होत असून शिरूर लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणारे खासदार अमोल डॉ अमोल कोल्हे व शिरूर हवेली मतदार संघाचे आमदार अशोक पवार  यांची नावे नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने काटेकोर बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

यावेळी दादासाहेब फराटे, मानसिंग पाचुंदकर, जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे , शिवसेनेचे अनिल काशीद, माजी सरपंच रामभाऊ सासवडे,  माजी नगरसेवक मिलिंद एकबोटे, भाजपाच्या जयश्री पलांडे,माजी सरपंच प्रफुल्ल शिवले, अंकुश शिवले, अनिल शिवले,ग्राम पंचायत सदस्य संगीता सावंत, वैभव भंडारे,लाला तांबे, पप्पू आरगडे, ग्रामसेवक शंकर भाकरे, सोमनाथ भंडारे, अनिल भंडारे , सचिन भंडारे, संजय भंडारे, धर्मवीर श्री छञपती संभाजी महाराज युवा मंच व शंभुभक्त व  आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

छञपती संभाजी महाराज पुतळा ,समाधीस्थळ, कवी कलश समाधीस्थळ आकर्षक फुलांनी सजवण्यात आले होते. ग्राम पंचायतीच्या वतीने स्वागताची तयारी करण्यात आली होती.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!