उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता
छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाला व कारकिर्दीला साजनारे भव्य दिव्य विकास आराखड्याचे सादरिकरण
कोरेगाव भीमा, ता. ७ : स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या भव्य स्मारकासह श्रीक्षेत्र वढू बुद्रुक – तुळापूरच्या सर्वांगिण विकास आराखड्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता मिळाली. त्यानंतर या आराखड्याचे काल पुण्यात सादरीकरणही करण्यात आले. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या स्मारकासह वढु-तुळापुरातील विविध विकास कामांसाठी एकुण ३४३ कोटींहून अधिकचा निधी मिळणार असल्याने श्रीक्षेत्र वढु – तुळापुरचा अभुतपुर्व असा कायापालट होणार असल्याचा विश्वास आमदार अशोक पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
- वढु बुद्रुक विकास आराखडा वैशिष्टे – १. स्मारकाची संरक्षक भिंत.२. स्मारक मुख्य प्रवेशद्वार.३. इन्व्हिझिबल शिल्प४. आच्छादित कॉरिडॉर.५. व्ह्यूइंग पॉईंट.६. छ. संभाजी महाराज समाधी.७. कवी कलश समाधी.८. देऊळ.९. मेडिटेशन हॉल.१०. सदर बाजार.११. स्मारकाचे एक्झिट द्वार.१२. प्रसाधन गृह.१३. तिकीट घर.१४. वाहनतळ.१५. प्रशासकीय इमारत व संग्रहालय.
- तूळापूर विकास आराखडा –१. छ.संभाजी महाराज समाधी.२. रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट३. व्यूइंग गॅलरी४. प्रशासकीय इमारत व संग्रहालय.५. अँफिथिएटर.६. सदर बाजार.७. वाहनतळ.८. स्वच्छता गृह९. प्रवेशद्वार.
- उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच आमदार अशोक पवार यांच्या पाठपुराव्यामुळे वढु-तुळापुराचा होणारा नियोजनबद्ध विकास व छत्रपती संभाजी महाराजांचे होणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक अत्यंत प्रेरणादायी होणार असल्याचा विश्वास वढु-तुळापुरचे सरपंच, उपसरपंच तसेच पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिक्षक अभियंता बी. एन. बहीर तसेच कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, अभियंता मयुर सोनवणे, वढू बुद्रुक येथील सरपंच सारिका अंकुश शिवले , माजी सरपंच प्रफुल्ल शिवले , स्वप्नील गायकवाड , अंकुश शिवले , अनिल शिवले , उपसरपंच राहुल ओव्हाळे , हिरालाल तांबे , ग्रामपंचायत सदस्या अंजली शिवले , कृष्णा आरगडे , माऊली भंडारे , सोसायटीचे संचालक संजय शिवले , सोनेश शिवले व पदाधिकारी उपस्थित होते .