Friday, May 24, 2024
Homeताज्या बातम्याश्री क्षेत्र वढू बुद्रुक येथे 'गाव चलो' अभियानांतर्गत माजी मंत्री बाळा भेगडे...

श्री क्षेत्र वढू बुद्रुक येथे ‘गाव चलो’ अभियानांतर्गत माजी मंत्री बाळा भेगडे यांच्या भेटीस ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

श्री छञपती संभाजी महाराज समाधी दर्शन, शाळा,अंगणवाडी सेविका , आशा वर्कर, मागास वर्गीय वस्ती व कुटुंबासह विविध समाज घटकांशी साधला संवाद

कोरेगाव भिमा – वढू बुद्रुक (ता.शिरूर) येथे भाजपा पक्षाच्या वतीने गाव चलो अभियान राबवण्यात येत असून श्री छञपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळी नतमस्तक होत गाव चलो अभियानाची सुरुवात करण्यात आली.दिवसभर माजी मंत्री संजय उर्फ बाळा भेगडे व पुणे जिल्हा सरचिटणीस भगवान शेळके व भाजप पदाधिकाऱ्यांनी  विविध समाज घटकांशी व नागरिकांशी संवाद साधत त्यांना शासकीय योजना व मोदी सरकार,राज्य सरकार यांची कामे सांगत नागरिकांच्या अडचणी समजून घेत उपाय योजना करण्यासाठी प्रयत्न केले.

     भाजपाने पक्षाचा प्रचार करण्यासाठी , केंद्र  व राज्य सरकारच्या योजनांची माहिती नागरिकांना व्हावी व अनेक कुटुंबे पक्षाशी जोडली जावित यासाठी‘गाव चलो’ अभियान राबविण्यात येत आहे याचं अभियानांतर्गत श्री क्षेत्र वढू बुद्रुक येथे येथे भाजपचे माजी मंत्री बाळा भेगडे , पुणे जिल्हा सरचिटणीस भगवान शेळके व पदाधिकाऱ्यांनी  भेट देत गावाची पाहणी केली. 

   सकाळी श्री छञपती संभाजी महाराज समाधी स्थळाचे दर्शन घेऊन ग्राम पंचायत,विविध विकास कार्यकारी सोसायटीच्याच पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यात आला.यानंतर शाळा भेट करण्यात आली यामध्ये विद्यार्थी,शिक्षक व संचालक, आशा वर्कर मदतनीस तसच गावातील बचत गट यांच्याशी संवाद साधला,त्यानंतर कुंभार समाजातील कुटुंबांना भेट देत त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या.

माजी मंत्र्यांसमोर गावचे उपसरपंच राहुल कुंभार यांनी घडवला माठ – गाव भेटीसाठी आलेल्या माजी मंत्री बाळा भेगडे यांनी कुंभार समाजाची भेट घेतली यावेळी तिथे काम करणारे व मातीचा माठ घडवणारे राहुल कुंभार यांच्याशी संवाद साधला यावेळी माजी मंत्री भेगडे यांनी राहुल ओव्हाळ यांच्या कष्टाचे व कौशल्याचे कौतुक केले यावर भगवान शेळके यांनी ते गावाचे उपसरपंच आहे असे म्हणताच भेगडे यांनी राहुल ओव्हाळ यांचे कौतुक करत जमिनीशी नाळ जोडलेल्या कष्टकरी कलाकार हेच समाजाचे भूषण असल्याचे सांगत शाल व श्रीफळ देत राहुल कुंभार यांच्यासह कुटुंबाचा सत्कार केला.

  यावेळी कुंभार समाजाची महत्वपूर्ण मातीची अडचण असते ती सोडवण्याची विनंती करण्यात आली यावर महसूल विभागाशी तातडीने संपर्क करत समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे माजी मंत्री भेगडे यांनी सांगितले .

       यानंतर भिमा नदीवर आलेल्या जलपर्णी बाबत चिंता व्यक्त केली तसेच नदी सुधार योजना,नमामि गंगा या स्तरावर काही योजना राबवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे भेगडे यांनी सांगितले.

      यावेळी माजी मंत्री व भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संजय (बाळा) भेगडे, पुणे जिल्हा सरचिटणीस भगवान शेळके, कामगार मोर्चाचे बाबासाहेब दरेकर, माजी सरपंच राहुल गव्हाणे, माजी संचालक कैलास सोनवणे, युवा मोर्चाचे अमित सोनवणे,माजी उपसरपंच  नितीन गव्हाणे, सोमनाथ शिवले, विस्तारक रघुनंदन गवारे,श्रीकृष्ण देशमुख, ऍड संजय सावंत उपस्थित होते.

राज्यभरात सध्या भाजपकडून ‘गाव चलो अभियान’ राबवण्यात येत आहे. मोदी सरकार व महायुती सरकारने राबविलेल्या विविध योजनांची माहिती सामान्य नागरिकांपर्यंत घेऊन जाणे तसेच पक्षाची संघटनात्मक बांधणी तसेच सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविणार आहे. –माजी मंत्री व भाजपा महाराष्ट्र  प्रदेश उपाध्यक्ष संजय (बाळा) भेगडे

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!