Monday, June 17, 2024
Homeताज्या बातम्याश्री क्षेत्र वढू बुद्रुक येथे ग्राम पंचायतीच्या माध्यमातून स्वच्छता मोहिमेस उदंड प्रतिसाद 

श्री क्षेत्र वढू बुद्रुक येथे ग्राम पंचायतीच्या माध्यमातून स्वच्छता मोहिमेस उदंड प्रतिसाद 

शालेय विद्यार्थी  व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

कोरेगाव भीमा – श्री क्षेत्र वढू बुद्रुक ( ता.शिरूर) येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला तसेच केंद्र व राज्य शासनाच्या वतीने महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून ‘स्वच्छता पंधरवडा’ ‘स्वच्छता ही सेवा’ २०२३ अंतर्गत १ ऑक्टोबर रोजी ‘एक तारीख एक तास’ सकाळी दहा वाजता हा स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला यावेळी ग्रामस्थांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून शालेय विद्यार्थी ,आजी माजी पदाधिकारी व ग्रामस्थ यांचा अभूतपूर्व सहभाग नोंदवत गावाची स्वच्छता केली.यावेळी शासनाच्या आदेशानुसार कलश पूजन व स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

   सरपंच सारिका अंकुश शिवले व ग्राम पंचायत पदाधिकारी ,ग्रामस्थ व  शालेय विद्यार्थ्यांनी सहभागी होत गावामध्ये मोठ्या प्रमाणावर साफ सफाई केली.

 यावेळी श्री क्षेत्र वढू बुद्रुक च्या सरपंच सारिका अंकुश शिवले, माजी सरपंच अंकुश शिवले ,अनिल शिवले , उपसरपंच राहुल कुंभार ,माजी उपसरपंच लाला तांबे, ग्रामपंचायत सदस्य माऊली भंडारे ,कृष्णा आरगडे , सोसायटी चेअरमन कांताराम आरगडे माजी चेअरमन राजेंद्र आहेर ,भाऊसाहेब श्रीपती शिवले , माजी उपसरपंच रमाकांत शिवले., ग्रामविकास अधिकारी शंकर भाकरे, शिक्षक वृंद ,ग्रामस्थ, विद्यार्थी व ग्राम पंचायत कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!