Friday, July 26, 2024
Homeताज्या बातम्याश्री क्षेत्र वढू बुद्रुक गावामध्ये विविध कामांचे सरपंच सारिका अंकुश शिवले यांच्या...

श्री क्षेत्र वढू बुद्रुक गावामध्ये विविध कामांचे सरपंच सारिका अंकुश शिवले यांच्या हस्ते भूमिपूजन

कोरेगाव भिमा – श्री क्षेत्र वढू बुद्रुक गावामध्ये विविध विकास कामाची उद्घाटने करण्यात आली.यामध्ये पिपळे जगताप रोड ते केंदूर रोड शिवेच्या मार्गाने, त्याचप्रमाणे वढू बुद्रुक पुनर्वसन गावठाणा मध्ये तीन लाखाची गटार लाईन, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वढू बुद्रुक तीन लाखाचे टॉयलेट , चाफा वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी फरशी बदलण्यासाठी व पाणीपुरवठ्यासाठी प्रत्येकी एक लाख रुपये असे विविध कामाचे उद्घाटन सरपंच सारिका अंकुश शिवले यांच्या हस्ते पार पाडण्यात आले.

यावेळी माजू सरपंच अंकुश शिवले, माजी सरपंच अनिल शिवले, माजी उपसरपंच लाला तांबे , ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर भंडारे ,कृष्णा आरगडे, संगीता सावंत, ग्राम विकास अधिकारी शंकर भाकरे , मंगेश शिवले, अशोक फरताळे व ग्रामस्थ उपस्थित होते

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!