Tuesday, October 8, 2024
Homeताज्या बातम्याश्री क्षेत्र वढू बुद्रुक येथे स्वरज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरणी...

श्री क्षेत्र वढू बुद्रुक येथे स्वरज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होत जयंती साजरी

कोरेगाव भीमा – श्री क्षेत्र वढू बुद्रुक येथील स्वरज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी यांच्या जयंतीनिमित्त सरपंच सारिका अंकुश शिवले व ग्रामस्थांनी समाधिस्थळी नतमस्तक होत विनम्र अभिवादन करत उत्साहात जयंती साजरी केली.
सकाळी स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या व छंदोगामात्य कवीकलश समाधीस्थळी नित्यपुजा , अभिषेक करण्यात आला. समाधीवर आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. गुलाबाच्या फुले , पाकळ्या, झेंडूची फुले, तुळशीच्या पानांनी आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. ग्राम पंचायत कार्यालयातही स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी सरपंच सारिका अंकुश शिवले, उपसरपंच राहुल कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार,माजी सरपंच अनिल शिवले,माजी उपसरपंच संजय शिवले, लालाशेठ तांबे, माजी चेअरमन संजय शिवले, ग्राम पंचायतीचे क्लार्क संतोष शिवले, धारकरी व शंभू भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते


पुणे जिल्ह्यातील किल्ले पुरंदर येथे छञपती संभाजी महाराजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी झाला होता व स्वराज्यरक्षक धर्मवीर संभाजी महाराजांचे बलिदान श्री क्षेत्र वढु बुद्रुक येथे ११ मार्च १६८९ येथे झाला होता.श्री क्षेत्र वढू बुद्रुक या तीर्थस्थळ बलिदान भूमी, शौर्यभूमी असे म्हणतात.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!