Monday, September 16, 2024
Homeताज्या बातम्यामहाराष्ट्रश्री क्षेत्र वढू बुद्रुक - कोरेगाव भीमा रस्ता विद्युत रोषणाईच्या प्रकाशाने लखलखणार

श्री क्षेत्र वढू बुद्रुक – कोरेगाव भीमा रस्ता विद्युत रोषणाईच्या प्रकाशाने लखलखणार

७५ लक्ष पुलाच्या कामासह पर्यावरणपूरक सुशोभीकरण

कोरेगाव भीमा : छत्रपती श्री संभाजी महाराज समाधी स्थळाला जोडणाऱ्या वढू बुद्रुक – कोरेगाव रस्त्याच्या दुतर्फा पथदिवे तसेच वृक्षारोपणासह पर्यावरण संवर्धक सुशोभीकरण करण्यासाठी आमदार अशोक पवार यांनी केलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असल्याने वढू-कोरेगाव रस्ता लवकरच विद्युत दिव्यांसह सुशोभित झाल्याने रोषणाईने झळकणार आहे.


छत्रपती श्री संभाजी महाराज समाधीस्थळ व परिसर विकासासंदर्भात चर्चा करण्यासाठी आमदार अशोक पवार यांच्या अध्यक्षतेखाली श्रीक्षेत्र वढू बुद्रुक येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी वढू बुद्रुक ग्रामपंचायत पदाधिकारी, शासकीय अधिकारी, तसेच कारखान्यांच्या प्रतिनिधींनी चर्चेत सहभाग घेतला.

यावेळी समाधीस्थळाला जोडणारा वढू बुद्रुक ते कोरेगाव भीमा हा कांक्रीटचा प्रशस्त रस्ता राज्यातून येणाऱ्या शंभुभक्तांबरोबरच स्थानिककारखानदारांनाही जड माल वाहतुकसाठी उपयोगाचा होणार आहे. मात्र, येथे होणाऱ्या जागतिक दर्जाच्या स्मारकाला शोभेल असे या रस्त्याच्या दुतर्फा पथदिवे तसेच वृक्षारोपणासह पर्यावरणसंवर्धक सुशोभीकरण करणे करणे आवश्यकअसल्याने यासाठी स्थानिककारखानदारांनीही सहभाग घ्यावा,असे आवाहन आमदार पवार यांनी केले. त्यास उपस्थित कारखान्यांच्या प्रतिनिधींनीही सकारात्मक उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

याप्रसंगी गटविकास अधिकारी देसाई, वढू बुद्रुकच्या सरपंच सारिका अंकुश शिवले, उपसरपंच राहुल ओव्हाळे, माजी सरपंच प्रफुल्ल शिवले,अंकुश शिवले, अनिल भाऊसाहेब शिवले, ग्रामपंचायत सदस्य कृष्णा आरगडे, माउली भंडारे, हिरालाल तांबे, पोलीस पाटील जयसिंग भंडारे, माजी सदस्य पांडुरंग आरगडे, तसेच पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, सार्वजनिक बांधकाम खात्याचे उप अभियंता, वीज वितरणचे महाजन साहेब व स्थानिक कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

श्री क्षेत्र वढू – कोरेगाव भीमा पुलाने जोडणार
श्रीक्षेत्र वढू बुद्रुक व कोरेगाव भीमा येथील झेड एफ कारखान्याजवळील ओढ्यावरील सध्याचा पूल ओढ्याला पूर आल्यावर अनेक गावांचा दरवर्षी संपर्क तुटत असल्याने आमदार ॲड अशोक पवार यांनी ७५ लक्ष रुपयांची तरतूद करून त्या ठिकाणी रस्ताही सरळ करण्याच्या सूचना दिल्याने लवकरच वढू- कोरेगाव भीमा पुलाने जोडणार असल्याचे माजी सरपंच प्रफुल्ल शिवले यांनी सांगितले.

आमदार अशोक पवार हे श्री क्षेत्र वढू बुद्रुक येथील छञपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळ विकासासाठी अत्यंत आग्रही असून जागतिक दर्जाचे व छञपती संभाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाला शोभणारे नेत्रदीपक स्मारक होण्यासाठी प्रयत्न करत आहेत यासाठी वढू बुद्रुक व तुळापूर येथील ग्रामस्थांसह महाराष्ट्रातील शिवशंभू भक्त आग्रही आहेत. राज्य सरकारने तातडीने स्मारकाचे काम मार्गी लावावा अशी आग्रही मागणी स्थानिक करत आहेत.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!