वृक्षारोपण ,डिजिटल साऊंड सिस्टीम, ड्रेस व पुस्तके वाटपाच्या कार्यक्रमांनी भव्य स्वागत
वढू बुद्रुक – पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्राथमिक , माध्यमिक शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू झाले . यावेळी जिल्ह्यातील सर्वच शाळांतून नवागतांचे आणि इतर विद्यार्थ्यांचे विविध उपक्रमांच्या माध्यमातून स्वागत करण्यात आले . दोन वर्षांच्या प्रदीर्घ कालवाधीनंतर शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता . वढू बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचे उत्साहाच्या वातावरणात स्वागत करण्यात आले. यावेळी ग्राम पंचायतीच्या माध्यमातून शालेय साहित्य, ड्रेस यांचे वाटप करण्यात आले . यावेळी ग्रामस्थांनी वृक्षारोपण करत निसर्गाशी असणारे नाते जपत शालेय विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वाटप तसेच यावेळी शाळेच्या सांस्कृतिक व विविध कार्यक्रमाचे अत्यंत आवश्यक असणारी डिजिटल साऊंड सिस्टिम संच ग्रामपंचायत तर्फे भेट देण्यात आला .
गावातील शरदचंद्र माध्यमिक विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देत सर्व शिक्षा अभियानांतर्गत पाठ्यपुस्तके स्वागत करण्यात आले. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजने अंतर्गत विद्यालयातील ८० विद्यार्थ्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले.यावेळी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी वढू बुद्रुकच्या सरपंच सारिका अंकुश शिवले , उपसरपंच राहुल कुंभार, माजी सरपंच अंकुश शिवले , अनिल शिवले , बापुसाहेब आहेर, ग्राम पंचायत सदस्य कृष्णा अरगडे, माऊली भंडारे,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्जेराव शिवले , उपाध्यक्ष उपाध्यक्ष रेखा शिवले , शरद शिवले , मंगेश शिवले , अर्चना भंडारे संध्या आरगडे , नीलम शिवले , रोहिणी वायकर व मुख्याध्यापक रवींद्र शिवरकर , उपशिक्षक राजाराम सकट हे उपस्थित होते.