Thursday, July 25, 2024
Homeस्थानिक वार्ताश्री क्षेत्र वढु बुद्रुक-वढू खुर्द पुलाने जोडणार : आमदार ॲड .अशोक पवार

श्री क्षेत्र वढु बुद्रुक-वढू खुर्द पुलाने जोडणार : आमदार ॲड .अशोक पवार

भीमा नदीवर शिरुर-हवेली तालुक्यांना जोडणा-या २२ कोटी ८६ लाख रुपये खर्चाच्या पुलाला मंजुरी

श्री वढु बुद्रुक (ता.शिरुर)- वढु खुर्द दरम्यान भीमा नदीवर शिरुर-हवेली तालुक्यांना जोडणा-या २२ कोटी ८६ लाख रुपये खर्चाच्या पुलाला मंजुरी मिळाली असल्याने वढु-तुळापुर हि दोन्ही तिर्थक्षेत्रे जोडण्यासाठी महत्वाचा प्रश्न मार्गि लागला असल्याचे शिरुर-हवेलीचे आमदार अ‍ॅड अशोक पवार यांनी सांगितले.

छत्रपती श्री संभाजी महाराजांचे समाधीस्थळ असलेले श्री क्षेत्र वढु बुद्रुक व शंभूराजांचे बलिदान स्थळ असलेले श्री क्षेत्र तुळापुर हि दोन्ही तिर्थक्षेत्रे भीमा नदीवर पुल बनवून जोडणे हि शंभूभक्तांची गेली अनेल वर्षाची मागणी होती. तुळापुर-आपटी दरम्यान काहि वर्षापुर्वि मंजुर करण्यात आला होता मात्र तांत्रीक अडचणींमुळे तो होऊ शकला नाही. त्यातच पेरणे फाटा येथिल विजयस्तंभ मानवंदना अभिवादन कार्यक्रम दि. १ जानेवारी रोजी होत असल्याने पुणे-नगर महामार्ग बंद ठेवावा लागत असल्याने पर्यायी मार्ग उपलब्ध करणे व शिरुर-हवेलीतील दळणवळण व सर्वांगिण विकासालाही श्री वढु बुद्रुक (ता.शिरुर)- वढु खुर्द दरम्यान भीमा नदीवर जोडणा-या नवीन पुलाने चालना मिळणार असल्याचे आमदार पवार यांनी सांगितले. भीमा नदिवरील या नविन पुलाबरोबर लोणीकंद -तुळापुर – आळंदी या रस्त्यासाठी रस्ते सुधार अंतर्गत २२ कोटी रुपये मंजुर झाले असुन श्री वढु बुद्रुक-कोरेगाव भीमा रस्त्यासाठी १९ कोटी रुपये मंजुर करण्यात आले आहे. पावसाळ्यात झेड एफ कारखान्याजवळील ओढ्यावरील रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने वढू-कोरेगाव-केंदूर हा रस्ता बंद होत असल्याने या ओढ्यावरील पुल बांधण्यासाठी ७५ लाख रुपये निधी मंजुर झाले आहे.
त्याचबरोबर छत्रपती श्री संभाजी महाराजांचे समाधीस्थळ असलेले श्री क्षेत्र वढु बुद्रुक व शंभूराजांचे बलिदान स्थळ असलेले श्री क्षेत्र तुळापुर हि दोन्ही तिर्थक्षेत्रांचा विकासासाठी १५० कोटीच्या विकास आराखडा तयार करण्यासाठी स्पर्धेचे लवकरच आयोजन करण्यात येवून या दोन्ही स्थळाचा जागतिक दर्जाचा विकास होणार असल्याचे शिरुर-हवेलीचे आमदार अ‍ॅड अशोक पवार यांनी सांगितले.

संबंधित लेख

1 COMMENT

  1. Very good. Always keep your pen with justice. Do enlift poor and needy people as you had suffered from all condition.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!