Wednesday, September 11, 2024
Homeसाहित्य/सामाजिकश्री क्षेत्र नरेश्वर येथे श्रावणी सोमवार निमित्त रक्तदान शिबिर संपन्न

श्री क्षेत्र नरेश्वर येथे श्रावणी सोमवार निमित्त रक्तदान शिबिर संपन्न

कोरेगाव भीमा – सणसवाडी ( ता.शिरूर) येथील श्री क्षेत्र नरेश्वर मंदिरामध्ये श्रावणी सोमवार निमित्त रक्तदान शिबिर पार पडले यावेळी ४७ रक्तदत्यांनी रक्तदान करत आपली अनोखी भक्ती शंभू महादेवाला अर्पित केली.

सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हाध्यक्षा उद्योगनगरी सणसवाडी ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सुनंदा नवनाथ दरेकर यांच्या नियोजनाने व अक्षय ब्लड बँक हडपसर यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर संपन्न झाले.यावेळी उपस्थित शंभू भक्तांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.

यावेळी सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा महिलाध्यक्षा उद्योगनगरी सणसवाडी ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सुनंदा नवनाथ दरेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक दत्तात्रय हरगुडे, सावता परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष गोरक्ष भुजबळ, उद्योजक नवनाथ दरेकर, गोरख दरेकर व ग्रामस्थांसह शिवभक्त उपस्थित होते.

आमदार अशोक पवार व माजी सभापती सुजाता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रेरणेने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिराच्या मध्यामातून अनोखी भक्ती वाटते एखाद्या नागरिकाचा जीव वाचवण्यात छोटासा सहभाग असणे ही देवाप्रती भक्ती आहे. – माजी सरपंच सुनंदा नवनाथ दरेकर, पुणे जिल्हा महिलाध्यक्षा सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!