Thursday, July 18, 2024
Homeताज्या बातम्याश्री क्षेत्र थेऊर येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी

श्री क्षेत्र थेऊर येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी

पालखी मिरवणूक सोहळा विशेष विलोभनीय

पुणे  –  श्री क्षेत्र थेऊर (ता.हवेली) येथील चिंतामणी मोरेश्वराचे दर्शन घेण्यासाठी भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली केली होती. नुकताच गणेशोस्तव सजारा झाल्याने भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यावेळी महिला व बालकांची गर्दी विशेष लक्षणीय होती.

      श्री क्षेत्र थेऊर येथील श्री चिंतामणी मोरेश्वराचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी श्रींची नित्यपुजा व इतर धार्मिक विधी पार पाडण्यात आला.यानंतर रात्री  साडे आठला श्रींची आरती करतायत येऊन पालखीतून मंदिर परिसरात मिरवणूक निघाली यावेळी मोरया हो .. गणपती बाप्पा. मोरया हो.. या भाविक भक्तांच्या जयघोषाने परिसर मंत्रमुग्ध होऊन वातावरण भक्तिमय झाले.

         श्री चिंतामणी मोरेश्वर चरणी ह.भ.प शिवानंद महाराज कांबळे यांची भजन सेवा झाली. चांगले कर्म केल्याने चांगले फळ मिळते. सुसंगती व सद्विचार असणारी माणसे  ,संतजन आयुष्यात असणे हे आयुष्याला योग्य आकार देतात असे प्रबोधन केले. चिंतामणी ग्राम विकास प्रतिष्ठान थेऊर यांच्या वतीने अन्नदान करण्यात आले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!