Saturday, May 25, 2024
Homeशिक्षणश्रीमती रुक्मिणीबाई पांडुरंग कदम कन्या विद्यालयाला लागेल ती मदत करणार - सुनिल...

श्रीमती रुक्मिणीबाई पांडुरंग कदम कन्या विद्यालयाला लागेल ती मदत करणार – सुनिल नारकर

कुलदीप मोहिते कराड

उंब्रज – उंब्रज (ता. कराड) येथील श्रीमती रुक्मिणीबाई पांडुरंग कदम कन्या विद्यालयात माजी गुरुकुल प्रमुख प्राध्यापक तानाजी कदम यांच्या पुढाकाराने आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार वितरण सोहळाचे आयोजन करण्यात आले होते. सुनील नारकर म्हणाले, रयत संस्थेच्या माध्यमातून कदम सरांनी विविध शाळांमध्ये केलेले काम हे उल्लेखनीय आहे. त्या त्या शाळांचा सर्वांगीण विकास झाल्याचे आज पहावयास मिळते. तानाजी कदम सर शिक्षणाच्या कामातून आजही सेवानिवृत्त झालेले नाहीत हे त्यांनी कार्यातून दाखवून दिले. कोरोना काळात सर्वांना ऑनलाईन अभ्यासामुळे मोबाईलचा वापर करावा लागला मात्र या पुढील काळात मोबाईलचा वापर टाळून अध्ययनाकडे अधिकाधिक लक्ष द्यावे तरच येणाऱ्या काळात आपला टिकाव लागू शकतो.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संभाजी पाटील यांनी विविध शाळांना देणगी देवून कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचाराचा वारसा बिल्डर सुनील नारकर हे जपत आहेत. प्रा. तानाजी कदम यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नामुळे उंब्रजच्या कन्या शाळेची इमारत लोक सहभागातून उभी राहिली. आदर्श विद्यार्थीनी पुरस्कार वितरण करण्याची परंपरा चालू ठेवून ते सेवावृत्तीनंतरही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देत आहेत.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता संकपाळ यांनी तर स्वागत टी.एस स्वामी, प्रास्ताविक माजी गुरुकुल प्रकल्प प्रमुख तानाजी कदम यानिंकेले तर आभार मुख्याध्यापिका जे.एस माने यांनी केले. यावेळी या कार्यक्रमास मुंबई येथील स्पर्शिका बिल्डर व डेव्हलपर्स सुनिल नारकर, रयत शिक्षण संस्थेचे माजी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य संभाजी पाटील, सरपंच योगराज जाधव, संजय पाटील, प्रल्हाद जाधव, कृष्णात माळी, प्रशांत पाटील, श्रीमती विजया भिसे, सुनिता माने, श्रीमती शारदा कोळी, डॉ दिपक माने, दिगंबर भिसे, प्रताप जगताप, एस.जे घोरपडे,पर्यवेक्षिका छाया पाटील तसेच इतर शिक्षक, कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम पार पाडण्याकरता विशेष परिश्रम घेतले.

“आदर्श विद्यार्थिनी पुरस्कारातून संस्कारित विद्यार्थी घडतील त्यामुळे रयत शिक्षण संस्थेचे माजी गुरुकुल प्रमुख तानाजी कदम यांचा हा उपक्रम भावी पिढीच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे . कदम सरांच्या शिक्षण क्षेत्रातील सेवेमुळे माझ्यासारखे असंख्य विद्यार्थी घडले त्यामुळे कदम सरांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याला बळ देण्यासाठी उंब्रजच्या कन्या शाळेला लागेल ती मदत करणार . – सुनील नारकर, स्पर्शिका बिल्डर व डेव्हलपर्स

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!