कोरेगाव भिमा – वाडा पुनर्वसन (ता.शिरूर) येथील माजी सरपंच नवनाथ रंगनाथ माळी यांच्या गट नं.७९ मधील उसाला दुपारी साडे तीनच्या सुमारास अचानक आग लागल्याने एक एकर ऊस आगीत जळाला असून यामध्ये शेतकरी नवनाथ माळी यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
वाडा पुनर्वसनचे माजी सरपंच नवनाथ रंगनाथ माळी यांच्या ऊसाला एम एस सी बी च्या तारांमुळे दुपारी साडे तीनच्या सुमारास अचानक आग लागल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ऊस १२ महिन्यांचा होता. तोडणीसाठी आलेल्या ऊसाला आग लागल्याने वर्षभराच्या कष्टाची माती झाली असून मोठे आर्थिक नुकसान झाली असून वीज वितरण महामंडळाने तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे.
ऊसाला आग लागल्याचे समजताच शेजारील शेतकऱ्यांनी ऊस विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.दुपारी कडक ऊन व वाहणारा जोरदार वारा यामुळे आग मोठ्या प्रमाणात फोफावली. यावेळी अशोक नाबगे, बाबुराव नाबागे, बाळासाहेब नबागे, बाळासाहेब सावंत, दत्तात्रय माळी, ऋषिकेश माळी व इतर शेतकरी यांनी आग विझवण्यासाठी मोलाची मदत केली.