Saturday, May 25, 2024
Homeताज्या बातम्याशेतकऱ्याचा नादच नाय.. घरातील गणपती समोर साकारली चांद्रयान मोहिमेची प्रतिकृती

शेतकऱ्याचा नादच नाय.. घरातील गणपती समोर साकारली चांद्रयान मोहिमेची प्रतिकृती

 लेकीच्या आनंदासाठी बापाने साकारला चांद्रयान मोहिमेचा देखावा

कोरेगाव भीमा – दरेकरवाडी (ता.शिरूर) येथील शेतकरी विनायक केमसे यांनी चांद्रयान मोहिमेचा देखावा आपल्या घरातील गणपती उत्सवात साकारला असून दरेकर वाडी व परिसरातील नागरिकांच्या तो आकर्षणाचा व चर्चेचा विषय ठरला असून देखावा पाहिल्यानंतर सर्वजण शाबासकीची थाप मात्र देत आहे. यामुळे शेतकऱ्याचा नादच नाय करायचा ठरवले तर घरात चांद्रयान मोहीम साकारत गणरायाला चंद्रावर विराजमान करत आपली भक्ती ,मुलीची इच्छाशक्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन जपला आहे.

 ग्रामीण भागातील शेतकरी आणि त्यांचा नाद याविषयावर कायमच चर्चेचा विषय ठरत असतो.दरेकरवाडी येथील शेतकऱ्याने आपल्या मुलीसोबत गप्पा मारताना तिला चांद्रयान मोहिमेची खूप आवड असल्याचे ओळखत तिचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी व तीच्या आवडीच्या चांद्रयान विषयावर सारखं त्यावर बोलायची मग तिच्या उत्सुकता व जिज्ञासेसाठी वडिलांनी घरातील गणपतीचा देखावाच चांद्रयान मोहिमेचा साकारला यासाठी विद्युत रोषणाई केली विविध कल्पकतेची जोड देत देखावा साकारला.

   गप्पांच्या ओघात त्यांच्या इयत्ता दुसरिमध्ये शिकत असलेल्या समृद्धी या मुलीने चांद्रयान बाबत उत्सुकता दाखवली आणि वडिलांनी त्याचा देखावाच मुलीसाठी साकारला असून येथे वडील मुलिसाठी काय काय करतात व करू शकतात याचे अनोखे उदाहरण पाहायला मिळाले आहे.

       सणसवाडी येथील एस के गुळाचा चहाचे मालक, प्रगतशील शेतकरी असणारे विनायक केमसे व पत्नी पूजा केमसे प्रामाणिक व कष्टाळू कुटुंब असून या उभय दांपत्याने घरगुती गणपतीचा केलेला  चांद्रयान मोहिमेचा देखावा नागरिकांना आवडला असून विद्युत रोषणाई व इतर साहित्याच्या मदतीने अगदी हुबेहूब चांद्रयान मोहीम साकारल्याने त्याच्या कलेचे व कल्पकतेचे कौतुक होत आहे.

     या देखाव्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञानाची व संशोधनाची अवड निर्माण होऊन आपणही देशासाठी असेच महान काम करण्याची प्रेरणा मिळण्यासाठी व चांद्रयान मोहिम यशस्वी होण्यासाठी काम केलेल्या सर्वांसाठी कृतज्ञता म्हणून व भारताचा नावलौकिक वाढवला याचा सार्थ अभिमान म्हणून हा देखावा साकारला असल्याची प्रतिक्रिया शेतकरी विनायक केमसे व पूजा केमसे यांनी व्यक्त केली आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!