Friday, July 26, 2024
Homeइतरशेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून दामदुप्पट करण्याचे आमिष दाखवून फसवणूक

शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून दामदुप्पट करण्याचे आमिष दाखवून फसवणूक

मिलिंदा पवार वडूज सातारा

वडूज येथील एका सेवानिवृत्त व्यक्तीला कमी अवधीत दामदुपटीने पैसे देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी वडूज पोलिसांनी कराड येथील एका विरोधात गुन्हा दाखल केला आहे निरंजन महेश कुलकर्णी राहणार सोमवार पेठ, कराड आसे त्या संशयिताचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की अब्राहिम हे एका टायर कंपनीतून सेवानिवृत्त झाले आहेत. ते वडूज येथील मुलगी व जावयाकडे राहण्यास आहेत कुलकर्णी यांची जावई व मुलगी यांच्याशी ओळख असल्याने अब्राहिम यांच्याशी ओळख झाली त्यानंतर तुम्हाला तुमचे पैसे एकशे पाच दिवसात दाम दुप्पट करून देतो असे सांगितले त्यानुसार अब्राहिम यांनी १४ लाख रुपये बँक द्वारे त्यांच्या खात्यात पैसे जमा केले मात्र मुदत संपल्यानंतर त्यांनी पैशाची मागणी केली असता काही रकमेचे चेक त्यांना दिले त्यामध्ये पैसे शिल्लक नव्हते फोन व केल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे देऊन टाळाटाळ केली. याबाबत अब्राहिम यांनी वडूज पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!