.
कोरेगाव भिमा -दरेकरवाडी (ता.शिरूर) येथील शुभम गणेश दरेकर याचेवर बाललैंगिक अत्याचार कायद्यान्वये नुकताच गुन्हा दाखल झाला. काही कामानिमित्त ओळख निर्माण झाल्यानंतर आरोपी शुभम याने ओळखीचा गैरफायदा घेत पिडीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी शुभम गणेश दरेकर याने पिडीत मुलीची ओळख वाढवून तिचा विनयभंग करीत तिला लज्जा उप्तन्न होईल असे वर्तन केले. पिडीतेच्या तक्रारीनुसार आरोपी शुभम याचेवर शिक्रापूर पोलिसांनी बाललैंगिक आत्याच्यार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला व सोबत विनयभंगाचाही गुन्हा दाखल केला. आरोपी शुभम दरेकर याला शिक्रापूर पोलिसांनी तात्काळ अटक केल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे करीत आहेत.