Wednesday, September 11, 2024
Homeताज्या बातम्याशिवप्रताप दिनी अफजल खानाच्या कबरीजवळील अतिक्रमणावर प्रशासनाचा हातोडा

शिवप्रताप दिनी अफजल खानाच्या कबरीजवळील अतिक्रमणावर प्रशासनाचा हातोडा

मोठ्या पोलीस फौजफाट्यासह प्रशासनाची धडाकेबाज कार्यवाही

प्रतिनिधी हेमंत पाटील सातारा

सातारा – सातारा दिनांक १० नोव्हेंबर

शिपप्रतापदिनी प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानच्या कबरीजवळील ( Afzal Khan Grave ) अतिक्रमणावर आज प्रशासनाचा हातोडा पडला आणि इतिहासाची सर्वांनाच आठवण झाली. १० नोव्हेंबर १६५९ ला छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढत वध केला होता. याच तारखेला अफजल खानाच्या कबरी जवळचं अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात झाली यामुळे सर्वांच्या डोळ्यासमोर शिवोरातपदिनाच्या दैदिप्यमान जाज्वल्य पराक्रमी इतिहासाची आठवण झाली

.

अफजलखानाच्या कबरीभोवती वनखात्याच्या हद्दीत काही अतिक्रमणं केली जात होती. अफजलखानाचं दैवतीकरण केलं जात असल्याचा आरोप अनेक वर्षांपूर्वी केला गेला. तेव्हापासून हा वाद सुरू होता. कोर्टाने याप्रकरणात २०१७ साली अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले होते. मात्र अद्याप कारवाई झाली नव्हती. अखेर शिवप्रतापदिनी प्रतापगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या अफजल खानच्या कबरी लगतचं अनधिकृत बांधकाम प्रशासनाच्या वतीने हटवण्यासाठी आलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अफजल खान कबरी लगतचा अनधिकृत बांधकामाचा वाद सुरू होता. अखेर १० नोव्हेंबरच्या पहाटेपासून हे अतिक्रमण हटवण्यास सुरूवात करण्यात आली. यावेळी परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.अनधिकृत बांधकाम हटवण्यात आल्यानंतर या ठिकाणी कलम १४४ जमावबंदी लागू करण्यात आले.

प्रशासनाची अतंत्य गुप्तता पाळत धडाकेबाज कार्यवाही – प्रतापगडावर सुरू असलेल्या कारवाईबाबत राज्य सरकार आणि सातारा जिल्हा प्रशासन यांनी अत्यंत गुप्तता बाळगली. अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी काही दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाच्या बैठका झाल्या होत्या. कोणताही अनुचित प्रकार या ठिकाणी होवू नये याचकरिता ही खबरदारी घेण्यात आल्याचं पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितलं. आम्ही हे ठरवून केलेलं नाही. आजच्या तारखेचा योगायोग नसून २०१७ च्या हायकोर्टाचा आदेशाचं पालन करत हे अनधिकृत बांधकाम पाडण्यात येत असल्याचं पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी स्पष्ट केलं.प्रतापगडावरील अफजल खानाच्या कबरी भोवतालचं बांधकाम पाडणं हा विषय एकदम संवेदनशील आहे. यामुळे पोलिसांनी प्रचंड गुप्तता पाळत ही कारवाई सुरू केली. जिल्ह्यातून व जिल्ह्याबाहेरील पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा मागवण्यात आल्याने परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

जिगरबाज सरकारची तडफदार कार्यवाही – अफजल खान वधाच्या शिवप्रताप ऐतिहासिक दिनी ही कारवाई करण्यात आल्याने यापूर्वीच्या सरकारांना जे जमलं नव्हतं, ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस सरकारनं व पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्यासह जिल्हा प्रशासनाने तडफदार कार्यवाही करत शिवप्रतापदिनी करून दाखवले असल्याची चर्चा सध्या नागरिकांमध्ये रंगल्या असून जिगरबाज सरकारची तडफदार कार्यवाही असे उद्गार नागरिकांनी काढले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!