Friday, July 12, 2024
Homeताज्या बातम्यादेश-विदेशशिवडे (उंब्रज) शिवसेनेच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोष्यारी यांच्या बॅनरला जोडे मारो आंदोलन

शिवडे (उंब्रज) शिवसेनेच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोष्यारी यांच्या बॅनरला जोडे मारो आंदोलन

कुलदीप मोहिते कराड

दिनांक २२ नोव्हेंबर

कराड –  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्याने सत्ताधाऱ्यांविरोधात सगळे विरोधक एकवटले आहेत. महाराष्ट्रातील जनतेमध्ये संतापाची भावना असून ठिकठिकाणी राज्यपाल यांच्या वक्तव्याविरोधात आंदोलन करण्यात येत आहेत .
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अपशब्द वापरले त्या विरोधात शिवडे( उंब्रज) ता कराड येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने जोडेमारो आंदोलन करण्यात आले या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले.
यावेळी माजी शिवसेना तालुकाप्रमुख संजय भोसले यांनी आपला रोष व्यक्त करत संबंधितांची हाकाल पट्टी त्वरित करुन सरकारने गुन्हे दाखल करावेत.
या प्रसंगी शिवडे गावचे शाखाप्रमुख .महादेव भोंगाळे,दिपक भोपते पाटील, दादासाहेब घाडगे,अरजूगडे ,ईमाम सय्यद, अनिल माने, संभाजी घाडगे, गुरुदास जांभळे व शिवसैनिक उपस्थित होते

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!