Friday, July 12, 2024
Homeताज्या बातम्यामहाराष्ट्रशिवजयंती पर्यंत राज्यपालांची हकालपट्टी झाली नाही तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना शिवनेरीवर...

शिवजयंती पर्यंत राज्यपालांची हकालपट्टी झाली नाही तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना शिवनेरीवर येऊ देणार नाही…अतुल बेनके

कोरेगाव भीमा – वढू बुद्रुक ( ता.शिरूर)

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अवमानकारक विधान केल्या नंतर राज्यभर राज्यपाल यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले तसेच राज्यपाल हटाव अशी मागणी देखील करण्यात आली.पुणे जिल्ह्यातील जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी जर राज्यपाल यांची शिवजयंती पर्यंत हकालपट्टी केली नाही तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना शिवनेरीवर येऊ देणार नाही.असा इशारा यावेळी बेनके यांनी दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांच्या अध्क्षतेखाली वडू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळी आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले.यावेळी सुनील टिंगरे, जयदेव गायकवाड, संदीप क्षीरसागर, अशोक पवार, अमोल मिटकरी,नितीन पवार,अतुल बेनके,रुपाली पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी ते बोलत होते.

अमोल कोल्हे यांच्या अनुपस्थितीने राजकीय चर्चेला उधाण – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांच्या अध्यक्षतेखाली वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळी आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाला स्थानिक खासदार अमोल कोल्हे हे अनुपस्थित असल्याने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.

यावर स्थानिक आमदार अतुल बेनके यांना विचारलं असता ते म्हणाले अमोल कोल्हे यांना पाठीचा आजार झाल्याने ते घरीच आहे.हा कार्यक्रम अचानक ठरला असून कोणालाही इथ निमंत्रित केलं नव्हत.आम्ही देखील स्वापूर्तीने इथ आलो आहे.आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या बाबतीत जी चर्चा सुरू आहे ती चुकीची असून कोल्हे कुठेही जाणार नसल्याचं खुलासा देखील बेनके यांनी यावेळी केलं.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!