शिव सप्ताह साजरा करण्यासाठी तिरंगा रॅली सह,३५२ वृक्षांचे वृक्षारोपण करण्यासह अन्नदान,वृक्षारोपण यासह विविध.
कोरेगाव भीमा – तुळापुर ( ता.हवेली)
येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त रॉयल ग्रुप तर्फे ३५२ वृक्षरोपण करण्यात आले . “शिवसप्ताहाचे” आयोजन करण्यात आले असून विविध सामाजिक उपक्रम राबवत सामाजिक बांधिलकी जपत छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखा कृतियुकत मुजरा करण्याचा प्रयत्न कोरेगाव भिमा येथील युवा सेनेचे गोविंद ढेरंगे यांच्यासह मित्रपरिवार करत आहे
छत्रपती शिवाजी महाराज यांची ३५२ वी शिवजयंती असल्याने रॉयल बुलेट ग्रुपचे उपकार्याध्यक्ष व वाहतुक सेना शिरूर तालुका प्रमुख गोविंद ढेरंगे यांच्या संकल्पनेने ३५२ झाडांची श्री क्षेत्र तुळापूर व परिसरात लागवड करण्यात आली असून एक आगळा वेगळा पर्यावरणपूरक शिव सप्ताहाच्या आयोजनाने शिवजयंती साजरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.यावेळी शिव सप्ताह साजरा करण्यासाठी १३ फेब्रुवारी किल्ले संवर्धन व स्वछता मोहीम राबविण्यात येणार आहे . १४ फेब्रुवारी रोजी दुर्गम आदिवासी भागातील लोकांना अन्नधान्य व कपडे वाटप करण्यात आले. . १५ फेब्रुवारी रोजी वृक्षारोपण , १६ फेब्रुवारी रोजी अनाथ व निराधार आश्रमातील मुलांसाठी जेवण देण्यात आले. १७ फेब्रुवारी रोजी हॉस्पिटल मधील रुग्णांना फळ वाटप व गोशाळेत चारा वाटप करण्यात येणार आहे . १८ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे आगमन १९ होणार आहे .
यावेळी शिरूर तालुका वाहतूक सेना प्रमुख व ग्रुपचे उपकार्यध्यक्ष गोविंद ढेरंगे, सचिव केतन ढगे, रोहित ढेरंगे, प्रतीक कंद, पवन उंद्रे, सुजित फड ऋत्विक देशमुख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
मोठ मोठे बॅनर लावणे , डी जे ,घोषणा यांच्याकडे पाठ फिरवून रॉयल ग्रुपने एक आदर्श समाजासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला असून त्यांनी “शिव सप्ताह ” अशी कृतियुक्त संकल्पना राबवत आजच्या तरुणाईला दिशा देण्याचं काम करत आहे.