Saturday, July 27, 2024
Homeताज्या बातम्यामहाराष्ट्रशिरूर शिवदुर्गप्रेमी प्रतिष्ठानची पन्हाळगड ते पावनखिंड अविस्मरणीय दुर्गभ्रमंती

शिरूर शिवदुर्गप्रेमी प्रतिष्ठानची पन्हाळगड ते पावनखिंड अविस्मरणीय दुर्गभ्रमंती


शिरूर – शिरूर तालुक्यातील शिवदुर्गप्रेमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा गड ते पावनखिंड पदभ्रमण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
शिवरायांची आरती करत नरवीर बाजीप्रभू देशपांडे व वीर शिवा काशिद यांच्या समाधीचे दर्शन घेत मोहिमेला सुरुवात करण्यात आली. खडतर अशी जुन्या मार्गाने किल्ले पन्हाळा ते पावनखिंड अशी ५४ किलोमीटरची पदभ्रमंती मोहीम नुकतीच यशस्वीपणे पार पडली. या पदभ्रमंतीत शिरूर तालुक्यातील ९० पेक्षा जास्त मोहिमेवर सहभागी झाले होते.
(Panhalgad to Pawankhind Unforgettable Durg Tour by Shirur Shiv Durg Pratishthan)

                   शिवकालीन प्रेरणादायी व रोमांचकारी  प्रेरणादायी इतिहास मोहिमेत सहभागी होणाऱ्या तरुणांना कळवा हा मोहिमेचा उद्देश होता. 
    इतिहासातून जीवन जगण्यासाठी व मार्गक्रमण करण्यासाठी ऊर्जा व प्रेरणा मिळाली असे अनेक शिवदुर्ग प्रेमींनी या प्रवासात सांगितले.शिरूर तालुक्यातील शिवदुर्गप्रेमी प्रतिष्ठान दर महिन्याला एक याप्रमाणे गडकिल्ले मोहीम राबवित असते. त्यांनी ही पन्हाळा (panhala )ते पावनखिंड(pavankhind ) मोहीम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.या मोहिमेत शिरूर तालुक्यातील शिरूर शहर ,शिक्रापूर, तळेगाव ढमढेरे, धामारी,मुखई,पाबळ, करडे,रांजणगाव गणपती, खंडाळे, कारेगाव व परिसरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील १३ ते ६५ वर्ष वयोगटातील दुर्गप्रेमी सहभागी झाले होते.(Panhalgad to Pawankhind Unforgettable Durg Tour by Shirur Shiv Durg Pratishthan)

या मोहिमेप्रसंगी दुर्गप्रेमी व अभ्यासक प्रकाश नरवडे, लक्ष्मण जाधव, रामचंद्र नवले, उमेश धुमाळ, अनिल शेळके सर यांनी प्रवासात शिवचरित्रातील घटनांबाबत मार्गदर्शन केले. रामदास बत्ते यांनी दुर्गप्रेमींना मोहिमेत सहभागी होण्यासाठी आवाहन केले होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!