Tuesday, September 10, 2024
Homeताज्या बातम्यामहाराष्ट्रशिरूर लोकसभा मतदार संघात खासदार डॉ .अमोल कोल्हे यांच्या संकल्पनेतील रक्तदान शिबिर...

शिरूर लोकसभा मतदार संघात खासदार डॉ .अमोल कोल्हे यांच्या संकल्पनेतील रक्तदान शिबिर संपन्न

जगदंब प्रतिष्ठानच्या वतीने उपक्रम यशस्वी साकार ,युवकांनी नोंदवला उत्स्फूर्त सहभाग

तळेगाव ढमढेरे प्रतिनिधी

तळेगाव ढमढेरे – दिनांक १४ ऑगस्टतळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव मोठ्या उत्साहात अनोखा पध्दतीने साजरा करत खासदार अमोल कोल्हे यांच्या संकल्पनेतून शिरूर लोकसभा मतदार संघात आज रविवार दि.१४ ऑगस्ट रोजी विविध ठिकाणी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तळेगाव ढमढेरे येथे शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात आसपासच्या गावातील युवा तरुणांनी मोठ्या प्रमाणात उस्फुर्त सहभाग नोंदविला .

शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या हस्ते रक्तदाते पत्रकार मयूर भुजबळ यांना पत्राचे वाटप

रक्तदान शिबिराचे उद्घाटन शिरूर हवेलीचे आमदार ऍड अशोक पवार यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून केले.तर पुणे जिल्हा राष्टवादी कॉंगेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब नरके यांनी फीत कापून केले.शिबिरास खासदार अमोल कोल्हे आणि पुणे जिल्हा पशुसंवर्धन माजी सभापती सुजाता पवार यांनी प्रत्यक्ष भेट देऊन कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या .

यावेळी शिरूर राष्ट्रवादी कॉंगेस अध्यक्ष राविद्र काळे , महिलाध्यक्षा विद्या भुजबळ,शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती वसंतराव कोरेकर,पंचायत समिती सभापती मोनिका हरगुडे ,आरती भुजबळ,शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती यशवंत ढमढेरे, अनिल भुजबळ,विश्वास ढमढेरे,विद्यमान संचालक सुदीप गुंदेचा,उपसरपंच मच्छिंद्र भुजबळ,सोसायटी चेअमन रामभाऊ ढमढेरे,समता परिषद सोमनाथ भुजबळ,माजी उपसरपंच गणेश तोडकर,विजय ढमढेरे,तंटामुक्ती अध्यक्ष रमेश भुजबळ,ग्राम पंचायत सदस्य गोविंद ढमढेरे,राहुल भुजबळ,मनोज आल्हाट आदी मान्यवरांसह मोठ्या प्रमाणावर युवा तरुण उपस्थित होते.

शिबिरात एकूण ८५ रक्तदात्यांनी रक्तदान केल्याची माहिती मार्केट कमिटी संचालक सुदीप गुंदेचा यांनी दिली.शिबीर संपन्न करण्यासाठी अनिल ढमढेरे,अमोल गायकवाड,दादाभाऊ नरके,गणेश पंडित,सुरज शेलार,अतुल पिंगळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

तळेगाव ढमढेरे येथील शिबिरास शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे,आमदार अशोक पवार व पुणे जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या सभापती सुजाता पवार यांनी प्रत्यक्ष भेट देऊन शिबिरास शुभेच्छा देऊन रक्तदात्यांचे आभार मानले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!