Thursday, July 25, 2024
Homeराजकारणशिरूर लोकसभा मतदार संघाचे प्रथम खासदार शिवाजी आढळराव पाटील यांचा हवेली तालुका...

शिरूर लोकसभा मतदार संघाचे प्रथम खासदार शिवाजी आढळराव पाटील यांचा हवेली तालुका गाव भेट दौरा उत्साहात संपन्न

कोरेगाव भीमा – सोमवारी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे प्रथम खासदार शिवाजी अढळराव पाटील यांनी हवेली तालुक्यात दौरा करत स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधला,श्री क्षेत्र तुळापूर या ठिकाणी युती सरकारच्या वतीने मंजूर झालेले १५८ कोटीच्या कामासंदर्भामध्ये गावातील ग्रामस्थांशी चर्चा केली व ग्रामस्थांनी सुचवलेल्या सूचनाची अंमलबजावणी करण्याची घोषणा केली, त्याचबरोबर तुळापूर ते आपटी पुलासाठी ही प्रयत्न करणार असल्याचे सांगून गावातील विविध कामासंदर्भात ग्रामस्थांनी निवेदन दिले, यावेळी भाजपा हवेली तालुका अध्यक्ष संदीप भोंडवे यांच्यासह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डोंगरगाव या ठिकाणी ग्रामस्थांनी माजी खासदार आढळराव यांचे जोरदार स्वागत केले तसेच वाडे बोल्हाई ते डोंगरगाव या रस्त्याची मागणी केली,जिल्हा नियोजनच्या माध्यमातून गावातील कामे त्वरित मार्गी लावून देनार असून वाडे बोल्हाई ते डोंगरगाव रस्ता करण्यासाठी प्रयत्न करणार असून यासाठी आवश्यक तो शासन दरबारी पाठ पुरावा करणार असल्याचे सांगितले यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पिंपरी सांडस या ठिकाणी फटाक्याच्या आतिशबाजी माजी खासदार आढळराव यांचे भव्य स्वागत करण्यात आलं,
यावेळी ग्रामस्थांनी विविध निवेदनाद्वारे विकास कामांची मागणी केली या बाबत माजी खासदार आढळराव पाटील यांनी त्वरित ४० लाख रुपयांच्या निधीची घोषणा करून तो त्वरित उपलब्ध करून देणार असल्याचे सांगत भविष्यातही गावाला काही कमी पडून देणार नसल्याचे यावेळी माजी खासदार आढळराव पाटील यांनी सांगितले.


या दौऱ्यावेळी जिल्हाप्रमुख उल्हास तुपे, जिल्हा संघटक निलेश काळभोर, उपजिल्हाप्रमुख शामराव माने, उपजिल्हाप्रमुख अनिल काशीद, तालुकाप्रमुख विपुल शितोळे, तालुका रामभाऊ सासवडे, उपतालुकाप्रमुख हरीश कांचन ,अक्षय हरगुडे ,दीपक लोणारी, वैद्यकीय विभाग तालुकाध्यक्ष अभिषेक पवार, विभाग प्रमुख सागर फरतडे उपविभाग‌ प्रमुख रवींद्र शिंदे उपस्थित होतेयावेळी सर्वांचे आभार हवेली तालुकाप्रमुख विपुल शितोळे यांनी मानले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!