- शिरूर लोकसभा मतदार संघात मनसेच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करण्याची पदाधिकारी व कार्यकर्त्यांची ग्वाही
- • सणसवाडी येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत शिरूर लोकसभा मतदार संघाचा आढावा
- पुणे जिल्हाध्यक्ष रामदास दरेकर यांच्यामुळे ग्रामीण भागातील तळागाळातील कार्यकर्त्याला प्रोत्साहन व प्रेरणा मिळाली1
कोरेगाव भीमा – आगामी काळातील शिरूर लोकसभा मतदार संघात मनसेच्या गावोगावी शाखांचे बळकटीकरण करत कार्यकर्त्यांना प्रेरणा व प्रोत्साहन देत राज ठाकरे यांचे विचार तळागाळातील नागरिकांपर्यंत पोचवू तसेच शिरूर लोकसभा मतदार संघात खासदार निवडून आणण्यासाठी आपण जीवाचे रान करू व मनसे चा झेंडा फडकावू अशी ग्वाही कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी दिली.
शिरूर लोकसभा मतदार संघाची बांधणी व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी सणसवाडी येथे कार्यकर्ता मेळावा गुरुवार दिनांक २४ ऑगस्ट रोजी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात विचारांची देवाणघेवाण करत मनमोकळा संवाद साधत संपन्न झाला. यावेळी कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मनसे पक्षाच्या गावोगावी शाखांचे बळकटीकरण, महिला शाखा, युवा संघटन, विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मजबूत फळी तयार करणे, मराठी माणसांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडणे, नागरिकांच्या समस्या सोडवणे यासह राज ठाकरे यांच्या विचारांना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचवणे असा संकल्प करण्यात आला.
यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष रामदास दरेकर यांनी ग्रामीण भागात मनसेच्या वाटचालीचा आढावा घेत महाराष्ट्रातील पहिल्या महिला पंचायत समिती सदस्य निवडून देण्याचा विक्रम सणसवाडी येथून करण्यात आला असून राज ठाकरे यांच्या विचारांवर अत्यंत निष्ठा व मराठी माणसाचे हित आणि सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवत त्यांना न्याय देण्यासाठी तत्पर राहणार असून शिरूर लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत मनसे पक्ष ताकदीनिशी उतरणार असून मनसेचा खासदार निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करू असे विचार व्यक्त केले.
मनसेचे महाराष्ट्र राज्याचे नेते राजेंद्र वागसकर, सरचिटणीस शिरूर लोकसभा पक्ष निरीक्षक अजय शिंदे,महाराष्ट्र राज्य वाहतूक सेना उपाध्यक्ष संजय जामदार,माथाडी कामगार सेना अध्यक्ष अरविंद गावडे, पुणे जिल्हाध्यक्ष रामदास दरेकर व विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला भगिनी उपस्थित होते.यावेळी मोठ्या संख्येने पुणे जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते