Friday, July 12, 2024
Homeसाहित्य/सामाजिकशिरूर येथे विविध उपक्रम राबवत दिव्यांग दिन उत्साहात साजारा

शिरूर येथे विविध उपक्रम राबवत दिव्यांग दिन उत्साहात साजारा

शिरूर –
येथे आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाच्या स्थापनेचा आनंद साजरा करताना अपंगांसाठी काम करणाऱ्या ४० दिव्यांगाचा सन्मान, दिव्यांगांना व्हीलचेअर, व अपंगाच्या विविध कलागुणांना वाव देत, शिरूर तालूक्यातील २०० दिव्यांग बांधवाना आवश्यक असलेले दिव्यांग सर्टिफिकेट आणि udid वाटप करण्यात आले.
प्रहार संघटनेच्या वतीने शिरूर तालुक्यातील दिव्यांग गणेश कचरे यांना दिव्यांगांची ऑनलाईन कामे सवलतीत व्हावी यासाठी प्रहार संघटनेच्या वतीने प्रिंटर व्यवसायासाठी भेट देण्यात आला .
यावेळी न्हावरा फाटा येथिल मूकबधिर मुलांचा डान्स , मतिमंद मुलींचे बँड पथक , मतिमंद मुलांची निवासी शाळेतर्फे नृत्य व दिव्यांग रांगोळी स्पर्धा घेऊन त्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. शिरूर तालुक्यात पंचायत समिती आवरत खूप जल्लोष व आनंदमय वातावरणात जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या दीव्यांगांना भोजन व्यवस्था निमोने गावचे सरपंच संज काळे शामकांत काळे,रवींद्र काळे यांच्या वतीने करण्यात आली व सर्व दिव्यांग बांधवाना चहा नाष्ट्याची व्यवस्था शिक्रापूर गावचे सामाजिक कार्यकर्ते योगेश शेंदाणे व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था रांजणगावचे सामाजिक कार्यकर्ते ऍड राहुल वाळके यांच्या वतीने करण्यात आली.
यावेळी
शिरूर पंचायत समिती गटविकास अधिकारी अजित देसाई, सहगटविकास अधिकारी जगताप सर, नगर परिषद दिव्यांग कक्ष अधिकारी महेश गावंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर , कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती सतीश कोळपे, शिरूर तालुका समाजकल्याण अधिकारी वाटमारे सर व जिल्हा परिषद दिव्यांग कक्ष कर्मचारी नारायण शिंदे व अतुल टाकळकर, सामाजिक कार्यकर्ते योगेश शेंदाणे , प्रहार संघटना पुणे जिल्हा अध्यक्ष शरद जाधव, महिला जिल्हाध्यक्ष अनिता कदम, उपजिल्हाध्यक्ष उज्वला गाडेकर, तालुकाध्यक्ष ज्योती हिवरे, शहराध्यक्ष नयना परदेशी, शिरूर शहराध्यक्ष गणेश कचरे, प्रहार ज्येष्ठ कार्यकर्ते निचित बाबा , कुंडलिक वायकुळे, संभाजी नवले , किसन फंड, खंडेराव गोरडे, विकास कारकूड, प्रशांत पटेकर , वंदना शिरतोडे , रेश्मा कडलक , वंदना रामगुडे, सुरेश पाटील, शिला लाड , कुंभार आप्पा , दिगंबर सातपुते, स्वाती साकोरे, अभिमन्यू थिटे व तालुक्यातील बहुसंख्य दिव्यांग बांधवांच्या उपस्थितीत जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!