Thursday, July 18, 2024
Homeताज्या बातम्याशिरूर येथे खासदार संजय राऊत यांचा जाहीर निषेध करत फोटोला जोडे मारो...

शिरूर येथे खासदार संजय राऊत यांचा जाहीर निषेध करत फोटोला जोडे मारो आंदोलन

ग्रामीण भागातही उमटले तीव्र पडसाद शिवसेना ( शिंदे गटाचे) कार्यकर्ते आक्रमक

कोरेगाव भीमा – दिनांक ३ जून

शिरूर ( ता.शिरूर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath shinde) यांचे सुपुत्र खासदार डॉ.श्रीकांत शिंदे ( Dr.shrikant shinde) यांच्यासंदर्भात प्रश्न विचारताच ठाकरे गटाचे प्रवक्ते राज्यसभा खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) हे काल ऑन कॅमेरा थुंकले होते. Shinde group aggressive against Sanjay Raut शिवसेना शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर भाष्य करताना खासदार संजय राऊत यांनी अत्यंत हीन भावनेतून अशोभनीय वर्तन केल्याने त्या कृतीचे राज्यभर पडसाद उमटत असून शिवसेना (शिंदे गट) आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज शिरूर शहरात त्याचे तीव्र पडसाद शिरूर शहराच्या मध्यवर्ती असणाऱ्या चौकात उमटले. यावेळी खासदार संजय राऊत यांच्या फोटोला जोडे मारून निषेध नोंदवित जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

यावेळी शिवसेनेचे (शिंदे गट)पुणे उपजिल्हा प्रमुख अनिल काशीद, शिरूर तालुका प्रमुख रामभाऊ सासवडे,शहर प्रमुख मयूर थोरात,पुणे जिल्हा समन्वयक आनंद हजारे, उपतालुका प्रमुख गणेश कोतवाल, संतोष वर्पे, तालुका संघटक संतिष गव्हाणे,उपशहर प्रमुख भरत जोशी,गणेश गिरे, सागर गव्हाणे, राजेंद्र जाधव,विजय गव्हाणे, सतिष गव्हाणे,विशाल जाधव,नाना पाचर्णे, संतोष वर्पे उपस्थित होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!