सुरक्षा रक्षकास जखमी करत कटावनिने मंदिराचा मुख्य दरवाजा व कुलूप यांच्यासह दानपेटी तोडत रकमेसह मोबाईल नेला चोरून
शिरूर – शिरूर (ता.शिरूर) येथील कापड बाजारातील जैन मंदिरामध्ये तीन चोरांनी सुरक्षा रक्षकाला मोठ्या स्क्रू ड्रायव्हरने जखमी करत दोघांनी मंदिराचे मुख्य दरवाजाला असलेले कुलुप कटावणीने तोडत मंदिरातील दानपेटी टॉमीने तोडुन त्यातील रोख रक्कम ३० हजार व सुरक्षा रक्षकांचा ७ हजार रुपयांचा मोबाईल अशी ३७ हजारांची चोरी झाल्याची खळबळ जनक घटना घडली आहे.
याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे मंदिराचे सुरक्षारक्षक पोपट सोनबा घनवट (वय ७२) रा. वाडेगव्हाण (पारनेर,अहमदनगर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. शिरूर पोलीस स्टेशन यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा रक्षक पोपट घनवट पहारा देत असताना दि.२० एप्रिल रोजी रात्री ०१.३० वाजण्याचे सुमारास २५ ते ३५ वयोगटाच्या तीन इसमांनी अचानक सुरक्षारक्षक पोपट घनवट यांना खाली पाडुन छाती दाबुन धरून त्यातील एकाने हातात मोठा स्कु ड्रायव्हर धरून डाक्यात मारला व त्याचे तोडांवर बोट धरून ईशा-याने ओरडु नको म्हणुन न बोलता ईशारा केला.दोघेजण मंदीराकडे गेले मंदिराचे मुख्य दरवाजाला असलेले लॉक व कुलुप कटावणीने तोडले व मदीरात आत प्रवेश करून आतील बाजुस असलेले लाकडी व जर्मल सिल्वरची असलेली दानपेटी टॉमीने तोडुन त्यातील असलेली अंदाजे तीस हजार रुपये रक्कम लोकांनी दान केलेले रोख रक्कम त्या दोघांनी काळया सँग/ बॅग मध्ये भरून घेतली.त्यातील असलेली चिल्लर हि खाली पडलेली होती.
त्यांनतर त्यांनी त्यांचेकडील कापडाने सुरक्षा रक्षकाचे हात पाय बांधले व फिर्यादीकडे असलेला रेडमी कपनीचा मोबाईल बळजबरीने काढुन घेवुन ते तीन अनोळखी ईसम हे पाठीमागील दरवाजावाटे निघुन गेले सुरक्षा रक्षकाने तोडाला बांधलेले कापडे सोडवुन रात्री ०२.०० वाजण्याचे सुमारास रमेश पुजारी यांना आवाज देवुन बोलावुन घेतले व त्यांना घडलेले घटनेबाबत माहीती दिली.
सदर घटनेची माहिती मिळताच तातडीने पोलीस उपअधीक्षक प्रशांत ढोले व पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांनी घटनास्थळी भेट दिली असून एलसीबी व पोलीसांचे पथक करत असून घटनास्थळी श्वानपथकही आणण्यात आले होते.सदर प्रकरणाचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील करत आहेत.