Thursday, June 20, 2024
Homeइतरशिरूर तालुक्यात सशस्त्र दरोड्यात वृद्ध महिलेचा मृत्यू, वृद्ध गंभीर जखमी

शिरूर तालुक्यात सशस्त्र दरोड्यात वृद्ध महिलेचा मृत्यू, वृद्ध गंभीर जखमी

सोन्याचांदीच्या दागिन्यांसह लुटली रोख रक्कम

शिरूर – शिरूर तालुक्यातील अरणगाव येथील ठोंबरेवस्तीत काही दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा(Armed robbery) टाकत वृद्ध दाम्पत्याला केलेल्या मारहाणीत एका वृद्धेचा मृत्यू तर वृद्ध व्यक्ती गंभीर जखमी झाला असून सोन्याचांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लुटली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.(Pune Crime News)

फुलाबाई आनंदा ठोंबरे (वय ६५, ठोंबरेवस्ती, शिरूर) असे दरोडे खोरांच्या हल्ल्यात ठार झालेल्या वृद्ध महिलेचे नाव असून आनंदा सावळेराम ठोंबरे असे जखमी वृद्धाचे नाव आहे.(Pune Gramin Police) या प्रकरणी बाबा ठोंबरे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूर तालुक्यातील ठोंबरेवस्ती येथे आनंदा सावळेराम ठोंबरे व त्यांची पत्नी फुलाबाई आनंदा ठोंबरे त्यांची कामे आटोपून झोपले होते. मध्यरात्री ३ च्या सुमारास काही दरोडेखोर हे ठोंबरे यांच्या घरात घुसले. आवाज झाल्याने ठोंबरे दाम्पत्य जागे झाले. यावेळी दरोडेखोरांनी वृध्द ठोंबरे दाम्पत्याला जबर मारहाण केली. तसेच घरातील दागिने आणि रोख रक्कम घेऊन ते पसार झाले. दरोडेखोरांच्या मारहाणीत फुलाबाई गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर आनंदा ठोंबरे हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचारसुरू आहेत.

दरम्यान, ठोंबरे यांच्या आरडा ओरड्यामुळे परिसरातील नागरिक जागे झाल्यामुळे दरोडेखोर पसार झाले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटणास्थळी जावून पंचनामा केला आहे. दरोडेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी तपास पथके तयार केली असून, सीसीटीव्ही आणि श्वान पथकाच्या साह्याने त्यांचा माग काढण्याचे काम सुरू आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटना स्थळी भेट देत घटनेची. माहिती घेत आहेत.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!