Saturday, July 27, 2024
Homeक्राइमशिरूर तालुक्यात बंधाऱ्याचे ढापे चोरांना ग्रामस्थांनी पाठलाग करून पकडले

शिरूर तालुक्यात बंधाऱ्याचे ढापे चोरांना ग्रामस्थांनी पाठलाग करून पकडले

शिरूर -शिरूर तालुक्यातील वडनेर ग्रामस्थांनी ढापे करणाऱ्यांना आपल्या सजगतेमुळे मुद्देमालासह पकडले आहे.पावसाळा सुरू होत असल्यामुळे नदीवरील बंधाऱ्यातील ढापे काढून ठेवण्यात आले होते . दि. १७ च्या पहाटे एक -दीडच्या सुमारास हे ढापे चार-पाच जणांनी टेम्पोमध्ये भरून चोरी करून घेऊन जात होते.


यावेळी नाथा शंकर निचित यांच्याकडे मजुरी करत असणाऱ्या मजुरास अचानक जाग आली बाहेर काहीतरी वाजते याचा कानोसा घेत नाथा निचित यांना फोन केला. दोघेजण बंधाऱ्याचे डावीकडून ढापे ठेवलेल्या ठिकाणी आले असता ढापे कमी झालेले दिसले त्यांनी ताबडतोब तंटामुक्तीचे अध्यक्ष संतोष निचित यांना फोन करून सदरची घटना कळवली.

तंटामुक्तीच्या अध्यक्षांनी तातडीने पोलिसांना फोन केला तसेच ग्रामपंचायत सदस्य नवनाथ निचित यांच्या मदतीने गाडीचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. तर गाडी कोणत्या दिशेने गेली हे न समजल्याने घटनास्थळी जाऊन गाडीच्या टायरच्या  खुनाचा मागवा घेत त्यांनी  गाडीचा पाठलाग केला. 

   दरम्यान उपसरपंच विक्रम निचित यांना फोन करत सी सी टी व्ही चेक करण्यास सांगितले व आजूबाजूच्या गावातील नागरिकांना फोन करून सतर्क करण्यास सांगितले. दरम्यान पंचतळे या ठिकाणी पोलिसांची रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग करणारी गाडी होती. 
   सदरचा टेम्पो जांबुतच्या दिशेने जात होता तंटामुक्तीचे अध्यक्ष संतोष निचित, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ निचित, नाथा निचित, संतोष थोरे हे गाडीचा पाठलाग करत होते. समोरून पोलीस व पाठीमागून ग्रामस्थ यामुळे चोरांनी गाडी ब्रिटानियाच्या डेअरीकडे वळवली .परंतु समोरच पांडाशेठ जगताप उभे होते . चोरट्यांनी जगताप यांना धमकावत पळ काढला. 
  पांडाशेठ यांनी गाडी ड्रायव्हर ला पकडून ठेवले. पोलीस आणि ग्रामस्थ तिथे पोहचले. व टेम्पो पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान ग्रामस्थांच्या सतर्कतेने चोर व टेम्पो पकडले गेला.त्यामुळे  हे चोर पकडणाऱ्या ग्रामस्थांचे जांबुत ,वडनेर, टाकळी हाजी परीसरातील नागरीकांच्या वतीने कौतुक होत आहे.

या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर धनंजय थेऊरकर व त्यांचे सहकारी करत आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!