शिरूर तालुक्यातील प्रथम ड्रोनच्या साहाय्याने मोजणी होण्याचा मान सणसवाडी गावाला
कोरेगाव भीमा – दिनांक १४ जून सणसवाडी ( ता.शिरूर) शासनाच्या स्वामित्व हक्क योजनेचा शिरूर तलुक्यातील सणसवाडी येथे शुभारंभ आमदार अशोक पावर ,पुणे जिल्हा भूमी अधीक्षक मोरे साहेब,पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर, तालुकाध्यक्ष रवी काळे ,सरपंच संगीता हरगुडे यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वर्ग खोल्यांचे उद्घाटन करण्यात आले.
शिरूर तालुक्यातील उद्योगनगरी सणसवाडी येथे ड्रोनच्या साहाय्याने मोजणी करण्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ड्रोनच्या मोजणी बाबत असलेल्या शंका नागरिकांशी संवाद साधून सोडविण्याचा प्रयत्न करण्यासाठी आमदार पवार यांनी सुचवले व स्वतः काही प्रश्न उपस्थित करून अधिकाऱ्यांची फिरकी घेत नागरिकांना प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहित केले. तसेच स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या प्राजक्ता वाळके – दरेकर यांचा सत्कार करण्यात आला.
याबाबत बोलताना पुणे जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक सूर्यकांत मोरे यांनी गावठाण जागेचा सर्व्हे करण्यात आलेला नव्हता तो करण्यात येणार आहे .घराच्या मालमत्तेच्या हक्कासाठी ‘स्वामित्व योजना आणली असून घरांचे प्रॉपर्टी कार्ड बनवण्यात येणार आहे .ड्रोनच्या साहाय्याने १२० फुटांवरून फोटो घेणार आहे प्रत्येक मिळकतीचे डिजिटलायझेशन करण्यात येणार ,प्रत्येक मालमत्तेची मोजणी कार्यालयाचे वर्ग दोन अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करणार असून , मालकी हक्काचे कागदपत्रे तपासण्यात येऊन त्या जागेची मालकी ठरविण्यात येणार असून क्षेत्र ,आकृती व जागेच्या नोंदी करण्यात येणार आहे. शिरूर तालुक्यातील ११४ गावांचा सर्व्हे करण्यात येणार आहे .साधारणतः तीन ते चार महिन्यात पूर्ण तालुका मोजून होणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक मोरे यंनी दिली.
सर्वसामान्य नागरिकांना मिळणारा लाभ – ड्रोनच्या साहाय्याने करण्यात येणाऱ्या मोजनिमुळे क्षेत्र निर्धारित होणार असून शासकीय नोंदी मुळे महत्त्वपूर्ण दस्तऐवज बनविण्यात येणार आहे यामुळे नागरिकांनी जागेच्या मालकीची कार्ड मिळणार असून बँक कर्ज अथवा इतर शासकीय कामात लाभ होणारा आहे. मोजणी तीन टप्प्यावर होणारा सून ग्राम पंचायत ,सर्व्हे ऑफ इंडिया व भूमिअभिलेख कार्यालय यांच्या तीन स्तरावर मोजणी होणार असल्याने त्यात अचूकता व पारदर्शकता राहण्याबरोबरच जलदगतीने काम होणार आहे. कायमस्वरूपी विश्वसनीय कागदपत्रे बनविण्यात येणार जनतेचा सहभाग महत्वाचा असून भूमी अभिलेख व मोजणी कर्मचाऱ्यांना नागरिकांनी सहकारी करणे गरजेचे राहणार आहे.यासाठी मालकी संबंधातील सर्व कागदपत्रे दाखवून सहकार्य करत मोजणी करायला हवी
ड्रोनच्या साहाय्याने मोजणी केल्याने होणारे लाभ –
१) ड्रोनच्या साहाय्याने मोजनिमध्ये जास्तीत जास्त अचूकता , वस्तुनिष्ठता व पारदर्शकता ही या मोजणीचे वैशिष्ट्य राहणार आहे.
२)कमी वेळात अचूक व मोठ्या क्षेत्राची मोजणी तीन टप्प्यावर होणार मोजणी (ग्राम पंचायत , भूमी अभिलेख विभाग, सर्व्हे ऑफ इंडिया )
३)कागदपत्रे तपासण्यात येऊन वस्तुनिष्ठ तपासणी होणार
प्रॉपर्टी कार्ड बनविण्यात येणार
४)अक्षांश व रेखांश यावर आधारित मोजणी असल्याने अचूकता
५)तातडीने मोजणी होणार असल्याने वाद विवाद कमी होत मोजणी विभागाचा जलदगतीने कामकाज होणार
६)रोव्हर व ड्रोन यांच्या साहाय्याने मोजणी होणार.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंगवले यांनी केले तर आभार माजी संचालक दत्तात्रय हरगुडे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास आमदार अशोक पवार ,जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक सूर्यकांत मोरे, सभापती सुजाता पवार, तालुकाध्यक्ष रवींद्र काळे,पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर , दूध संघाचे संचालक स्वप्निल ढमढेरे, संगीता नवनाथ हरगुडे, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष अनिल दरेकर , उपसरपंच सागर दरेकर , सुनंदा दरेकर, शशिकला सातपुते, सुवर्णा दरेकर, राजेंद्र दरेकर, दत्तात्रय हरगुडे , विजयराज दरेकर, दगडू दरेकर, माजी संचालक दत्तात्रय हरगुडे,मोजणीचे विनायक ठाकरे , नवनाथ दरेकर , माजी चेअरमन सुहास दरेकर,निलेश दरेकर ,सुभाष दरेकर, सावता माळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोरक्ष भुजबळ, अनिल गोटे ग्राम विकास अधिकारी बाळनाथ पवणे, मुख्याध्यापक सुरेश भंडारे व शिक्षक ,कर्मचारी वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.
ड्रोनच्या साहाय्याने मोजणीने अचूकतेसह वाद कमी होऊन कामामध्ये पारदर्शक कारभार होण्यास मदत होणार आहे . शिरूर भूमी अभिलेख कार्यालयाच्या कारभारावर लक्ष असून लवकरच त्यासाठी नवीन धोरण आणण्याचा प्रयत्न करत आहे. दिलेल्या तारखेला मोजणी व्हावी , मोजनी कामकाज सरळ होण्यासाठी अभ्यास सुरू असून मोजणी क्षेत्रात बदल करणे गरजेचे असल्याचे सांगत रेशनिंग व्यवस्थेत बदल केल्याने राज्याचे पाच हजार कोटी रुपये वाचले आहेत. -आमदार अशोक पवार