Friday, June 21, 2024
Homeक्राइमशिरूर तालुक्यात अष्टविनायक मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेने पायी चालणारा युवक ठार

शिरूर तालुक्यात अष्टविनायक मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेने पायी चालणारा युवक ठार

कवठे येमाई येथील दुर्दैवी  घटना

शिरूर –  कवठे येमाई (ता. शिरूर)  येथील गणेश बाबुराव इचके हा अष्टविनायक हायवे रोडवर म्हाळोबा नगरकडे जाणाऱ्या फाट्याजवळ पायी चालत असताना अज्ञात वाहनाने त्याला धडक देऊन त्यात तो गंभीर जखमी होऊन मुत्यु पावला आहे.

Photo of helmet and motorcycle on road, the concept of road accidents

      याबाबत सविस्तर हकीकत अशी की, दि.२१डिसेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास ते दि .२२  डिसेंबर रोजी रात्रो ०१/०० वा.चे दरम्यान कवठे येमाई गावच्या हद्दीत पारगाव शिंगवे ते कवठे येमाई कडे जाणाऱ्या अष्टविनायक हायवे रोडवर म्हाळोबा नगर कडे जाणारे गणेश बाबुराव इचके (वय ३५ वर्षे रा. म्हाळोबा नगर कवठे येमाई) हा पायी चालत जात असताना त्यास कोणत्या तरी अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाने त्याचे ताब्यातील वाहन हयगयीने, अविचाराने, रहदरीचे नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवुन भाऊ गणेश यास धडक देवुन त्याच्या डोक्यास ,हातापायाला, पाठीला, लहान मोठ्या गंभार दुखापती होवुन त्याच्या मुत्युस कारणीभुत झाला आहे. 

    अपघाताची खबर न देता निघून गेला आहे . याबाबत मयताचा भाऊ सुनिल बाबुराव इचके यांनी शिरूर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे.या घटनेचा पुढील तपास सहाय्यक  पोलीस  निरीक्षक अमोल पन्हाळकर हे करत आहे .

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!