Thursday, July 18, 2024
Homeताज्या बातम्याशिरूर तालुक्यातील हिवरे कुंभार गावच्या सरपंच व उपसरपंच पदी पतीपत्नीची निवड

शिरूर तालुक्यातील हिवरे कुंभार गावच्या सरपंच व उपसरपंच पदी पतीपत्नीची निवड

सरपंचपदी दिपाली दिपक खैरे व उपसरपंचपदी दीपक खैरे या पतिपत्नीवर विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव

कोरेगाव भीमा – हिवरे कुंभार ( ता.शिरूर) येथील ग्राम पंचायतीच्या इतिहासात पत्नी दिपाली दिपक खैरे यांची बिनविरोध निवड झाली असून उपसरपंचपदी दीपक सुरेश खैरे यांची पूर्वीच निवड झाली होती त्यामुळे शिरूर तालुक्यातील हिवरे कुंभार ग्राम पंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदी पतिपत्नी यांची निवड झाल्याने समाज मध्यामांसह नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा पाहायला मिळाली.

ग्राम पंचायत हिवरे कुंभार सरपंच शारदा विकास गायकवाड यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने सरपंच पदाच्या जागेची आज निवडणूक पार पडली यावेळी सरपंच पदासाठी दिपाली दीपक खैरे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली .यामुळे पतीपत्नीला गावचा कारभार एकत्रित पाहण्याची सुवर्णसंधी मिळाली असून गावच्या इतिहासातील अस्विस्मरणीय घटना घडली. आहे. ग्रामस्थांनी भंडाऱ्याची उधळण करत आपला आनंद साजरा केला.

माजी सरपंच शारदा विकास गायकवाड यांनी मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली असून त्यांचे पती विकास गायकवाड यांनी सामुदायिक विवाह सोहळा असो की इतर कामातून आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे.

हिवरे कुंभार गावच्या उपसरपंच पदी दीपक खैरे यांची अगोदरच निवड झाली आहे. आता त्यांच्या पत्नीची सरपंचपदी निवड झाल्याने गावचा कारभार पती पत्नीच्या हातात आला आहे. दिपाली खैरे या अगोदर ग्रामपंचायत सदस्या होत्या. त्या उच्चशिक्षित असून त्या आता घराच्या जबाबदारी सोबतच गावचा कारभार देखील सांभाळणार आहेत. खैरे पती पत्नीच्या हातात कारभार आल्याने गावचा विकास सर्वांगीण व दर्जेदार होईल , असा विश्वास येथील नागरिकांनी व्यक्त केला आहे.
या निवडणुकीवेळी पाबळ मंडल अधिकारी प्रशांत शेटे, ग्रामसेवक वनिता माने, तलाठी अश्विनी जोरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे आंबेगाव शिरूरचे उपाध्यक्ष अमोल जगताप, शहाजी जाधव, रेवननाथ जगताप, माजी सरपंच शारदा गायकवाड, विश्वनाथ शिर्के, सोमनाथ आढागळे, संध्या गायकवाड, हौसाबाई जगताप, नयना मांदळे, श्यामराव साळुंखे, भाऊसाहेब साळुंखे, संतोष गायकवाड, आनंदा खैरे, राजेंद्र साळुंखे, फक्कड साळुंखे, चेअरमन पंढरीनाथ तांबे, पांडुरंग मांदळे, अष्टविनायक एज्युकेशन सोसायटीचे कारभारी पुंडे, सोमनाथ मांदळे, मधुकरराव शिर्के, उद्योजक विकास नाना गायकवाड, प्रदीप मांदळे, शामल जगताप आदी यावेळी उपस्थित होते.

या अभूतपूर्व घटनेने शिरूर तालुक्यासह समजाध्यामावर मोठी चर्चा पाहायला मिळाली सरपंच दिपाली दिपक खैरे व उपसरपंच दिपक खैरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत असून उभयतांच्या अभिनंद व स्वागत समारंभ कार्यक्रमासाठी खासदार अमोल कोल्हे उपस्थित राहणार आहेत.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!