Friday, June 21, 2024
Homeक्राइमशिरूर तालुक्यातील गोलेगाव येथे घरफोडी ... ग्रामीण भागात भीतीचे वातावरण

शिरूर तालुक्यातील गोलेगाव येथे घरफोडी … ग्रामीण भागात भीतीचे वातावरण

सोने दागिन्यांसह तीन लाख पंच्याहत्तर हजारांचा ऐवज लांबवत घरफोडी….

शिरूर – शिरूर शहरासह तालुक्यात घरफोडी, जबरी चोरी, टु – व्हीलर, फोर व्हीलर चोरी, सोनसाखळी चोरी, विद्युत मोटार, केबल चोरी सातत्याने होत आहे. चोरीच्या गुन्हयांची मालिका थांबायला तयार नसून चोरांचा सुळसुळाट झाला आहे. घरफोडीबाबत सविस्तर हकिकत अशी की, दि. २१जून रोजी सकाळी १० : ३० ते दि. २२जून रोजी पहाटे ०५ : ३० वाजण्याच्या पूर्वी गोलेगाव रोड येथील गट नं .३२५ (ब) मधील रविंद्र सुर्यभान कळमकर रा. पाचर्णे मळा, गोलेगाव रोड शिरूर यांच्या राहत्या फ्लॅटच्या दरवाजाचे कड़ी व कोयंडा कापून त्यावाटे अज्ञात चोरट्याने घरामध्ये प्रवेश करून लाकडी कपाटात ठेवलेले रोख पैसे व सोन्याचे दागिने असा एकून किंमत रू ३, ७५, ०००/ रू. मुद्देमाल घरफोडी करून चोरून नेला आहे. याबाबत शिरूर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली असून या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एकनाथ पाटील हे करत आहे.

घरफोडी,चोरी गुन्हे होत असल्याने ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण पसरले आहे .शिरूर शहरासह तालुक्यात घरफोडी, जबरी चोरी, टु – व्हीलर, फोर व्हीलर चोरी, सोनसाखळी चोरी, विद्युत मोटार, केबल चोरी सातत्याने होत आहे. चोरीच्या गुन्हयांची मालिका थांबायला तयार नसून चोरांचा सुळसुळाट झाला आहे. तसेच विविध सामाजिक विषयावर आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्यांना आरोपींकडून वारंवार फोनवरून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहे.तरीही पोलिस प्रशासन त्यांच्या विरोधात ठोस कारवाई करत नसल्याचे सामाजिक कार्यकर्ते सावळाराम आवारी यांनी सांगितले आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!