Saturday, May 25, 2024
Homeताज्या बातम्याशिरूरच्या बी डी ओ कार्यालयाचा रिकाम्या खुर्च्या कारभार पाहतायत काय ?

शिरूरच्या बी डी ओ कार्यालयाचा रिकाम्या खुर्च्या कारभार पाहतायत काय ?

शिरूर गट विकास अधिकारी व कर्मचारी नेमके कोणत्या महत्वपूर्ण शासकीय कामाला गेल्याने रिकाम्या खुर्च्या असल्याने पंचायत समितीचा कारभार चालतो तरी कसा????

शिरूर – शिरूर पंचायत समिती कार्यालयाचा कारभार रिकाम्या खुर्च्या करतात की काय ? असा प्रश्न निर्माण होत असून या कार्यालयातील अधिकारी नेमके गेलेत तरी कुठे ? तालुक्याच्या कार्यालयात विवीध कामानिमित्त ग्रामीण भागातील अनेक जण मोठ्या अपेक्षेने येत असतात पण कार्यालयात जाऊन पाहिल्यावर दिसतात त्या रिकाम्या खुर्च्या आणि अधिकारी गायब असा कारभार चालत असेल तर सर्वसामान्य नागरिकांनी न्याय मागायचा तरी नक्की कुणाकडे ? यावर वरिष्ठ कार्यालयाचा काही अंकुश आहे की नाही ? असा प्रश्न निर्माण होत आहे.

       शिरूर पंचायत समिती कार्यालयात दुपारच्या वेळेला   पंचायत समितीचे गट विकास अधिकारी महेश डोके व इतर कर्मचारी दुपारी ऑफिस मध्ये नसल्याने आपल्या अर्जावर नक्की काय कार्यवाही झाली हे विचारायचे कुणाला, वरिष्ठ कार्यालयास केलेल्या अर्जावर नक्की कार्यवाही काय झाली ? हे विचारायचे तरी कुणाला याबाबतीत संबधित तक्रारदाराला कोणतीही सूचना अथवा पत्रव्यवहार केला जात नाही मग ग्राम प्रशासन विभागाचा कारभार चालतोय कसा असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

   स्वराज्य राष्ट्रनिर्माण सेना पक्षाच्या वतीने ग्राम सेवक रतन दवणे  व कोरेगाव भिमा ग्राम पंचायतीच्या कारभाराची चौकशी करण्याचा अर्ज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिला होता.याबाबत चौकशी करण्यासाठी ॲड मोहम्मद शेख गेले असता दुपारच्या वेळी रिकाम्या खुर्च्या आणि अधिकारी कुठे गेले हे कोणालाच सांगता येईना त्यांनी याबाबत हालचाल रजिस्टर वर नोंद करून गेले असल्याबाबत विचारणा केली असता पळापळ झाली.

तालुक्यातील ग्राम प्रशासन व इतर विभागांचे केंद्र बिंदू असणाऱ्या कार्यालयात अधिकारी उपलब्ध नसावा याचे आश्चर्य वाटत असून तालुक्याच्या कार्यालयाची ही अवस्था असेल तर न्याय मागायचा तरी कुठे ??

याबाबत कार्यालयीन कामकाज अधिकारी होलगुंडे यांच्याशी संपर्क साधला असता एका कर्मचाऱ्याच्या घरातील लग्न असल्याने लग्नाला गेले असल्याबाबत माहिती देत थोड्या वेळाने कॉल करतो म्हणून संपर्क कट केला.तर याबाबत अधिकची माहिती घेण्यासाठी गट विकास अधिकारी महेश डोके यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

       कोरेगाव भीमा येथील अपंग बांधवांच्या तक्रार अर्जावर त्यांच्याशी कोणताही पत्र व्यवहार पंचायत समिती कडून करण्यात आला नाही तसेच कार्यालयीन कामकाज संहितेच्या नुसार त्यावर काय कार्यवाही झाली याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

 कोरेगाव भीमा येथील एका खाजगी कंपनीच्या एन ओ सी बाबत एका ग्राम पंचायत सदस्य यांनी अर्ज देऊन त्यावर कार्यवाही बाबत स्पष्टता नाही तसेच स्वराज्य राष्ट्र निर्माण सेना पक्षाच्या वतीने वरिष्ठ कार्यालयास दिलेल्या अर्जावरील कार्यवाही बाबत संपर्क साधला असता गट विकास अधिकारी महेश डोके यांनी अर्ज मिळाला नसल्याची प्रतिक्रिया परवा दिली होती त्यावर काल संपर्क केला असता त्यांनी संपर्क करणे टाळले याप्रकरणी चौकशी करण्यासाठी ॲड मोहम्मद शेख गेले असता त्यांना कार्यालयात रिकाम्या खुर्च्या दिसल्याने आश्चर्य व्यक्त केले. याबाबत वरिष्ठ कार्यालयात तक्रार करण्यात येणार असल्याचे ॲड मोहंमद शेख यांनी सांगितले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!