Saturday, July 27, 2024
Homeताज्या बातम्याशिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांची कामगिरी ग्रेट...नागरिकांचा रस्ता खुला केला थेट

शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांची कामगिरी ग्रेट…नागरिकांचा रस्ता खुला केला थेट

दोन्ही बाजू कायदेशीर समजून घेत कागदोपत्री व प्रत्यक्ष वस्तुस्थिती समजून घेत पुढील निर्णय येईपर्यंत पूर्वीची परिस्थिती कायम ठेवण्याचा आदेशप्रत्यक्ष पाहणी करत स्वस्तुस्थिती पाहत शेतकरी,बिल्डर ,नागरिक यांची बाजू समजून घेत रस्त्यावरील भिंत काढण्याचा आदेश देत नागरिकांचे जिंकले मन

कोरेगाव भिमा – सणसवाडी (ता.शिरूर) येथील रस्त्याची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आलेल्या तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी शेतकरी, बिल्डर नागरिकांची बाजू समजून घेत तातडीने पूर्वी जसा रस्ता चालू होता तसाच चालू ठेवण्यात यावा,सुरू असलेले भिंत बांधण्याचे काम थांबवून पूर्वीच्या सुरू असलेल्या रस्त्यावर बांधलेली भिंत तातडीने पाडण्याचा आदेश देत दोन्ही बाजूंनी आपली कागदपत्रे सादर करावीत तसेच पुढील निर्णय येईपर्यंत पूर्वी जसा रस्ता सुरू होता तो सुरू ठेवण्याचा आदेश दिल्याने नागरिकांनी शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या तातडीने निर्णय घेत न्याय देण्याच्या भूमिकेचे मनःपूर्वक स्वागत करत आभार मानत तहसीलदार असावे तर असे हे उद्गार काढले.

याबाबत ग्राम पंचायत सणसवाडीच्या सरपंच सुवर्णा रामदास दरेकर यांनी ग्राम पंचायतीच्या माध्यमातून पत्रव्यवहार करत संबधित बाबितीत प्रशासनाचे लक्ष वेधले तसेच स्थानिक नागरिकांनीही याबाबत पत्रव्यवहार करत प्रशासनाला आपली अडचण व विद्यार्थ्यांची शाळेत जाण्यासाठी शैक्षणिक अडचण, शेतकरी व कामगार यांची समस्या याबाबत आवाज उठवत आंदोलनाचा इशारा दिला होता.

सणसवाडी (ता.शिरूर) गव्हाळे वस्ती, नरके वस्ती, भुजबळ वस्ती, जयसिंग आबा वस्ती, जय हिंद नगर याकडे जाणाऱ्या तब्बल पन्नास वर्षाचा वहिवाटीचा रस्ता बिल्डरांनी अडवल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी, वृद्ध व आजारी असणाऱ्यांना हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी तर कामगारांना कामावर जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली होती.याबाबत स्थानिक नागरिक व प्रतिनिधींनी याबाबत आवाज उठवत ग्राम पंचायत सणसवाडी, शिरूर गट विकास अधिकारी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कोरेगाव भिमा येथील मंडलाधिकारी,शिरूर तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, प्रांत स्नेहलता देवकाते,पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्र व्यवहार करत आपली व्यथा मांडली होती.

सांगा ना साहेब शिकायचं कसं – येथील चार वस्त्यांवर राहायला असलेल्या विद्यार्थ्यांना शाळेला जाण्यासाठी रस्ताच बंद असल्याने विद्यार्थ्यांची शाळेत जाण्यासाठी गैरसोय होत होती.एकत्र राहायला रानात,शाळा दूर जाण्यासाठी रस्ताच बंद असल्याने शाळेचा रस्ताच बंद होता मग शाळेत जायचं कसं असा पेच निर्माण होऊन सांगा ना शिकायचं असा उद्विग्न करणारा प्रश्न उपस्थित होऊ लागला होता.

दहाव्याला जाण्यासाठी लोकांना जावे लागले पाच किलोमिटर अंतरावरून – नेहमीचा रहदारीचा रस्ता बंद झाल्याने नागरिकांचे हाल होऊ लागले होते. विद्यार्थ्यांना शाळा,दवाखाना,कामगार,दूध उत्पादक शेतकरी यांची मोठी अडचण झाली होती.अशीच दुरावस्था काहींना सकाळी सकाळी अनुभवायला मिळाली.सणसवाडी येथील एका दहाव्याला जाण्यासाठी नरके वस्ती व इतर वस्तीवरील लोकांना पाच किलोमीटर अंतरावरील इतर रस्त्याचा वापर करून यावे लागल्याने दहाव्याच्या श्रद्धांजली वाहण्यास नागरिकांना लांबून यावे लागल्याने दहाव्याच्या ठिकाणी याबाबत चर्चा पाहायला मिळाली.

यावेळी तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा पवार गट) जिल्हाध्यक्ष मोनिका हरगुडे, माजी संचालक दत्तात्रय हरगुडे, माजी उपसरपंच शिवाजी दरेकर, माजी उपसरपंच सागर दरेकर, ग्राम पंचायत सदस्य राजेंद्र दरेकर, मंडल अधिकारी विकास फूके ,मोहन हरगुडे, निकिता हरगुडे, पाणी पुरवठा चेअरमन राजेंद्र हरगुडे,व शेतकरी ,ग्रामस्थ ग्रामस्थ उपस्थित होते.

सणसवाडी येथील रस्त्याची पाहणी केली असून पूर्वी सुरू असणारा रस्ता खुला करण्याचा आदेश दिला असून दोन्ही बाजूंनी आपली कागदपत्रे सदर करावीत तसेच निर्णय येईपर्यंत पूर्वीचा रस्ता सुरू ठेवण्यात यावा बांधण्यात आलेली भिंत पाडण्याचा आदेश देण्यात आला आहे. – तहसीलदार बाळासाहेब म्हस्के , शिरूर

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!