Wednesday, September 11, 2024
Homeक्राइमशिरुर तालुक्यातील गणेगाव खालसा येथे दरोडा टाकुन रोख रकमेसह सोन्याच्या दागिन्याची चोरी

शिरुर तालुक्यातील गणेगाव खालसा येथे दरोडा टाकुन रोख रकमेसह सोन्याच्या दागिन्याची चोरी

शिरूर – शिरुर तालुक्यातील गणेगाव खालसा येथील पद्मावती वस्ती येथे गुरुवार (दि 15) रोजी पहाटे 3 च्या सुमारास 30 ते 35 वर्षाच्या अनोळखी व्यक्तींनी घराचा दरवाजा उचकटुन त्यांच्या हातातील लाकडी दांडक्याने मारहाण करत, कोयता आणि कु-हाडीचा धाक दाखवत 30 हजार रोख रक्कम तसेच सोन्याच्या दागिन्यासह 2 लाख 23 हजार रुपयांची चोरी करुन पोबारा केला आहे.

याबाबत संजय मोतीराम पवार (वय 32) रा. गणेगाव खालसा, पद्माकर वस्ती, ता. शिरुर, जि. पुणे यांनी याबाबत रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार (दि 15) रोजी पहाटे तीनच्या सुमारास चार अज्ञात व्यक्ती संजय पवार यांच्या घराचा दरवाजा उचकटून आत शिरले. त्यांनी हातातील लाकडी दांडक्याने मारहाण करत, कोयता आणि कु-हाडीचा धाक दाखवत फिर्यादी यांच्या पत्नी पुष्पा यांच्या गळयातील आणि कपाटातील सोन्याचे गंठण, नेकलेस, कानातील झुंबर, अंगठया, मणिमंगळसुत्र, लहान मुलांचे चांदीचे दागिने आणि 30 हजार रोख रकमेसह 2 लाख 23 हजार रुपयांची चोरी केली आहे. रांजणगाव MIDC चे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विनोद शिंदे हे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!