Saturday, November 9, 2024
Homeताज्या बातम्याशिक्रापूर हद्दीत दोन दिवसात वेगवेगळ्या अपघातांत पाच जणांचा मृत्यू

शिक्रापूर हद्दीत दोन दिवसात वेगवेगळ्या अपघातांत पाच जणांचा मृत्यू


दि २७ जानेवारी.
शिक्रापूर – शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दोन दिवसा मध्ये शिक्रापूर, कोरेगाव भीमा, जातेगाव फाटा येथे झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये महेश राजाराम गव्हाणे, श्रीकांत सुर्यकांत उबाळे, उद्धव सखाराम सातपुते, बाबूशोना आबेदअली शेख व अजयभान चंद्रकांतभाई भावसार या पाच जणांचा मृत्यू झाला.
                               शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये २५ जानेवारी रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास महेश गव्हाणे हा त्यांच्या ताब्यातील एम एच १२ व्ही डी १३९३ या दुचाकी हून चाललेला असताना पाठीमागून अहमदनगर बाजूने आलेल्या (एम.एच. १२ एस.वाय १९९०)या कारची महेशला धडक बसून महेश राजाराम गव्हाणे वय २५ वर्षे रा. फडतरे वस्ती कोरेगाव भीमा ता. शिरुर यांचा मृत्यू झाला.दरम्यान महेश याला घेण्यासाठी आलेल्या रुग्णवाहिकेची (एम. एच. १२ डी. डब्ल्यू ६०७३)या दुचाकीला धडक बसून दुचाकी चालक श्रीकांत सुर्यकांत उबाळे ( वय २६ वर्षे) रा. ढेरंगेवस्ती कोरेगाव भीमा यांचा मृत्यू झाला तर रुग्णवाहिका चालक वैभव गजानन डोईफोडे व अक्षय रवींद्र बनसोडे दोघे रा. बजरंगवाडी शिक्रापूर (ता. शिरुर ) हे जखमी झाले.
या दोन अपघातांनंतर २६ जानेवारी रोजी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास उद्धव सातपुते हे शिक्रापूर पाबळ चौकातून रस्ता ओलांडत असताना पुणे बाजूने आलेल्या अज्ञात वाहनाची सातपुते यांना धडक बसून झालेल्या अपघातात उद्धव सखाराम सातपुते (वय ३५ वर्षे ) सध्या रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. इसाद ता. गंगाखेड जि. परभणी यांचा मृत्यू झाला, त्यांनतर सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास चाकण रोड पंजाबी ढाबा समोर बाबूशोना शेख हे रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाची धडक बसून झालेल्या अपघातात बाबूशोना आबेदअली शेख (वय २७ वर्षे) रा. करंदी फाटा ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. सीजग्राम ता. भरतपूर जि. मुर्शिदाबाद कलकत्ता याचा मृत्यू झाला असून त्यानंतर रात्री बारा वाजण्याच्या सुमारास अजयभान भावसार हा शिक्रापूर चाकण रस्त्याचे नजीक हॉटेल चंद्रमा समोरून रस्ता ओलांडत असताना (एम एच १४ के जे ६२१९) या कारची भावसार यांना धडक बसून झालेल्या अपघातात अजयभान चंद्रकांतभाई भावसार (वय ३८ वर्षे) रा. सोनगढ ता. सोनगढ जि. तापी राज्य गुजरात याचा मृत्यू झाल्याची घटना घडली याबाबत शिक्रापूर पोलिसांनी शंकरसन श्रीनरहरी राऊत रा. लोहगाव जि. पुणे, रुग्णवाहिका चालक वैभव गजानन डोईफोडे रा. बजरंगवाडी ता. शिरुर जि. पुणे, आदित्य बापू हांडे रा. चिंचोशी ता. खेड जि. पुणे यांच्यासह दोन अज्ञात वाहन चालकांवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस करत आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!