Friday, July 12, 2024
Homeस्थानिक वार्ताशिक्रापूर शुद्ध पाणी पुरवठेदार संघटनेच्या अध्यक्ष पदी किरण लोखंडे यांची निवड

शिक्रापूर शुद्ध पाणी पुरवठेदार संघटनेच्या अध्यक्ष पदी किरण लोखंडे यांची निवड

कोरेगाव भीमा – शिक्रापूर ( ता.शिरूर) येथील शुद्ध पाणी पुरवठा समितीच्या अध्यक्षपदी किरण उत्तमराव लोखंडे यांची निद्वड करण्यात आली . या संघटनेचे शिक्रापूर पंचक्रोशीत ५५ सदस्य असून ७० ते ७५ गाड्या सुद्ध पाणी पुरवठ्याचे काम करत असतात. ग्राहकांना शुद्ध पिण्याचे पाणी व दर्जेदार सेवा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून संघटनेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष किरण लोखंडे यांनी सांगितले.

यावेळी मोठ्या प्रमाणात वाढलेले पेट्रोल ,डिझेल यांचे दर , इतर खर्च यामुळे २० लिटर पाण्यासाठी १५ रुपये इतका दर सर्वानुमते केल्याचे लोखंडे सांगितले तसेच यासाठी मोठ्या प्रमाणात वाढलेली इंधन दरवाढ कारणीभूत असून सर्वसामान्य नागरिकांना परवडेल अस दर निश्चित केला असून त्यांना दर्जेदार सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे यावेळी लोखंडे यांनी सांगितले. नवनिर्वाचित अध्यक्ष किरण लोखंडे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संघटनेचे विविध पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!