Monday, June 17, 2024
Homeस्थानिक वार्ताशिक्रापूर येथे बाळासाहेबांची शिवसेना यांचा घोडगंगा किसान क्रांती पॅनलला जाहीर पाठिंबा

शिक्रापूर येथे बाळासाहेबांची शिवसेना यांचा घोडगंगा किसान क्रांती पॅनलला जाहीर पाठिंबा

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या सूचनेनुसार घोडगंगा किसान क्रांती पॅनलला विजयी करण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना सक्रिय

कोरेगाव भीमा – दिनांक १ नोव्हेंबर
शिक्रापूर ( ता.शिरूर) येथील पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांच्या हितासाठी व सुखासाठी आम्ही घोडगंगा किसान क्रांती पॅनल ला पाठिंबा देत असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या सूचनेनुसार आम्ही घोडगंगा किसान क्रांती पॅनलला बहुमत मिळवून देण्यासाठी शिरूर तालुक्यातील बाळासाहेबांची शिवसेनेचे सर्व पदाधिकारी ,सभासद प्रयत्न करणं असून
शेतकऱ्यांची होणारी हेळसांड त्यांची होणारी गळचेपी थांबवण्यासाठी ,शेतकऱ्यांच्या हितासाठी पाठिंबा जाहीर, प्रतिटन ५०० रुपये भाव कमी मिळत असून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक थांबवणे यासाठी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माझी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या सूचनेने आम्ही पाठिंबा देत असल्याचे मत बाळासाहेबांची शिवसेना शिरूर तालुका प्रमुख रामभाऊ सासवडे यांनी व्यक्त केले.
शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक कणा असणारा, त्यांच्या आयुष्याला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावणारा रावसाहेब दादा पवार घोडगंगा
सहकारी साखर कारखाना वाचला तर शेतकरी वाचेल व तालुक्यातील सहकार क्षेत्र वाचेल यासाठी भ्रष्टाचार व पारदर्शक कारभार करून उसाला तीन हजार प्रतीटन बाजारभाव, कारखाना कर्जमुक्त, सभासदांना ७० किलो प्रतिवर्षी साखर, ३० दिवसांमध्ये सभासंदांच्या वारसांच्या नोंदी सुलभ पद्धतीने, वजन काटा ऑनलाईन करण्याबरोबरच इतर इतर वजन काट्यावर ऊस वजन करण्याची मुभा, कामगारांचे पगार नियमित व रिटेंशन सुरू करणार , ऑनलाईन ऊस नोंद करणे कामी ॲप सुरू करणार असून ऊस तोडणी प्रोग्रॅममध्ये राजकीय हस्तक्षेप करणार नाही असा जाहीरनामा प्रसिद्ध करत कारखान्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला असून
रावसाहेब दादा पवार सहकारी साखर कारखान्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता शेतकरी वाचला पाहिजे त्याचे आर्थिक हित साधले पाहिजे या भूमिकेतून आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी घोडगंगा किसान क्रांती पॅनलला पाठिंबा असल्याचे सांगण्यात आले.
आमदार पवार यांनी पैलवणाचे प्रेरणास्थान आत्माराम फराटे व गोविंद फराटे यांच्या बाबतीत हा काय आखाडा आहे काय ?? असे वक्तव्य करून त्यांच्यासह पैलवान क्षेत्राला कमी लेखले महणून निषेध व्यक्त करण्यात येत आहे कुस्ती क्षेत्र पवित्र असून पैलावानांचे आराध्यदैवत श्रीराम भक्त बजरंगबली यांनी अहंकारी रावणाची लंका दहन केली होती तालुक्यातील या अहंकारी रावणाची लंका पैलवान , सामान्य नागरिक व मतदार नक्कीच संपवतील असे मत सासवडे व्यक्त केले.

यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पुणे उपजिल्हा प्रमुख अनिल काशीद, शिरूर तालुका अध्यक्ष रामभाऊ सासवडे, पुणे भाजपा सरचिटणीस रघुनंदन गवारे, जिल्हा सल्लागार रोहिदास शिवले, जिल्हा समन्वयक आनंदराव हजारे, जिल्हा संघटक युवराज निंबाळकर, तालुका संघटक दत्तात्रय गिलबिले, उपतालुका प्रमुख शरद नवले,गणेश कोतवाल,संतोष वर्पे,सागर दरेकर,करेगव ग्राम पंचायत सदस्य तेजस नवले, भारत नवले, कारेगाव शाखा प्रमुख विकास नवले,उप विभाग प्रमुख अभिजित गवारे, दशरथ नागवडे, गोरक्ष पवार, उपतालुका प्रमुख संजय पवार, मच्छिंद्र कदम, दत्तात्रय वाजे उपस्थित होते.

रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शिरूर तालुक्यातील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने घोडगंगा किसान क्रांती पॅनलला पाठिंबा देऊन सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी मोलाचे काम करतील तसेच आगामी काळातील जिल्हा परिषद, पंचायत समिती ,बाजार समिती या निवडणुकांमध्ये भाजपा बरोबर खांदयास खांदा लावून यश संपादन करतील – अनिल काशीद , उपजिल्हाप्रमुख बाळासाहेबांची शिवसेना

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!