सुदैवाने कोणतीही जीवित हनी नाही
संबंधित घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्र बारामती फाटा उपकेंद्र शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार मिलिंद गायकवाड, लांगी, चांदगुडे यांनी घटनास्थळी धाव घेत मदत केली.या घटनेमुळे काही काळ पुणे नगर रोड महामार्गवरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पुणे नगर महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामाला गती असली तरी यामुळे गेल्या आठवड्यापासून अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे नागरिकांच्या जीवाशी होणारा खेळ आता तरी थांबेल का असा प्रश्न निर्माण होत आहे.
यामध्ये एम एच २३ ए एस ७४५४ या कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. या अपघातामध्ये वाहनचालक योगी किरकोळ जखमी झाले आहे