शिक्रापूर – शिक्रापूर (ता.शिरूर) येथील मोठ्या प्रमाणावरील नगरिकिकरण व जनावरांसाठी पाणी टंचाई जाणवत असून चासकमान धरणातील चालू आवर्तनाचे पाणी वेळ नदीपात्र , बारा नंबर नंबर चारी, राऊतवाडी व २४ वां मैल येथील तळे यांना पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी सरपंच रमेश गडदे,उपसरपंच सीमा लांडे, माजी उपसरपंच सुभाष खैरे व ग्राम पंचायत सदस्य त्रिनयन कळमकर यांनी ग्राम पंचायत पत्राद्वारे केली.
शिक्रापूर येथे औद्योगिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणात नगरीकिकरण झाले असून येथील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.तसेच येथे शेतीही मोठ्या प्रमाणात केली जाते येथील जनावरांना पिण्यासाठी पाण्याची गरज भासत असून वेळ नदी पात्रात पाणी थोडेच शिल्लक असल्याने येथे मोठ्या प्रमाणात पाण्याचा तूटवडा जाणवत असून नागरिकांचे व प्राण्यांचे हाल होऊ नये यासाठी सध्या सुरू असलेल्या चासकमान धरणातील आवर्तनातून वेळ नदी, बारा नंबर चारी, राऊतवाडी व २४ वा मैल येथील तळे, येथे आवर्तन सोडण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी शिक्रापूर ग्राम नगरीचे आदर्श सरपंच रमेश गडदे, उपसरपंच सीमा लांडे, माजी उपसरपंच सुभाष खैरे, ग्रामपंचायत सदस्य त्रिनयन कळमकर तसेच शाखा अभियंता व कर्मचारी उपस्थित होते.