Saturday, July 27, 2024
Homeताज्या बातम्याशिक्रापूर ग्राम पंचायतीच्या वतीने श्रींच्या मूर्तीचे कृत्रिम हौदात विसर्जन करत श्रींच्या तीन...

शिक्रापूर ग्राम पंचायतीच्या वतीने श्रींच्या मूर्तीचे कृत्रिम हौदात विसर्जन करत श्रींच्या तीन हजार मूर्तींचे संकलन

शिक्रापूर ग्रामपंचायत व श्री फाउंडेशनच्या माध्यमातून पर्यावरण प्रेरक सोहळा साजरा

कोरेगाव भीमा  – शिक्रापूर (त.शिरूर) येथील ग्राम पंचायतीचे सरपंच रमेश गडदे व सर्व ग्राम पंचायतीचे  पदाधिकारी दरवर्षी प्रमाणे  पर्यावरण प्रेरक व पूरक असा गणेश विसर्जन सोहळा साजरा करत वेळ नदीचे पाणी शुद्ध राहण्यासाठी व पर्यावरणाला पूरक असा विसर्जन सोहळा साजरा केला असून यासाठी कृत्रिम विसर्जन हौदात श्रींच्या मूर्तींचे विसर्जन करण्याच्या उपक्रमात ग्रामस्थांनी व तरुणाईने उत्स्फूर्त सहभाग घेत या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले.  

 महाळुंगे येथील श्री फाउंडेशनचे सर्वेसर्वा सागर पाडळे यांनी तातडीने श्री गणेशाच्या मूर्ती पाचव्या, सातव्या, नवव्या आणि दहाव्या दिवशी विसर्जन केलेल्या सर्व मूर्ती अंदाजे तीन हजार गणेश मूर्तींचे संकलन करून माळुंगे येथील श्री फाउंडेशन संस्था यांच्याकडे पाठवून दिल्या व श्री गणेशाचे हार फुले द्रुवा नारळ,फळे  सर्व  व  अलंकार शिक्रापूर ग्रामपंचायतने ठेवलेल्या कुंडीमध्ये निर्माल्य टाकण्यात आले.शिक्रापूर ग्रामपंचायत च्या माध्यमातून असे अनेक उपक्रम राबविण्यात येत असतात. 

  या सोहळ्यास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे  पोलीस निरीक्षक अधिकारी प्रमोद क्षीरसागर तसेच त्यांचे सर्व पीएसआय व सर्व पोलीस बांधव यांचे मोलाचे सहकार्य यामध्ये लाभते .

याप्रसंगी शिक्रापूर ग्रामनगरीचे  सरपंच रमेश गडदे, उपसरपंच मोहिनी संतोष मांढरे ,ग्रामपंचायत सदस्य पूजा भुजबळ ,त्रिनयन कळमकर उषा राऊत ,ग्राम विकास अधिकारी शिवाजी शिंदे , दिपक भुजबळ, तानाजी राऊत ,सतीश सासवडे ,पप्पू सासवडे युवराज कळमकर, महेश कळमकर, सौरभ भुजबळ अजित अंकुश घारे, सोनू आळंदीकर, बबलू मांढरे, पानमंद यशकीर्ती , सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मंगल सासवडे,  ग्रामपंचायत कर्मचारी गणेश भुजबळ, सुभाष भुजबळ ,बाळासाहेब चव्हाण, गणेश राऊत ,प्रकाश चव्हाण ,गणेश गायकवाड ,प्रशांत वाडेकर ,माणिक चव्हाण, बबलू शेख ,चंद्रकांत वाबळे, तुळजा माने ,सिकंदर शेख, दरवडे राजगुरू ,विलास पवार, योगेश केवटे ,लाला मोरे व समस्या व्हाट्सअप ग्रुप चे सर्व सहकारी यांनी चांगल्या प्रकारे नियोजन केल्याबद्दल ग्रामस्थांनी व परिसरातील सर्व गणेश मंडळांनी मोठ्या प्रमाणात कौतुक करत व अभिनंदन केले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!